एक्स्प्लोर

मोठी बातमी! गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षे शिक्षा, 1 लाख रुपये दंड; मंत्रिमंडळ निर्णय

विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकांचा व निर्णयांचा धडाकाच सुरू आहे

मुंबई : राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुभोशीकरण हा नेहमीच सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji maharaj) आपल्याला दिलेली विरासत म्हणजे हे गड किल्ले आहेत. आजही जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आणि शिवरायांच्या शौर्याची साक्ष, रक्तरंजीच लढायांचा इतिहास हे गड किल्ले सांगतात. त्यामुळे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचं स्थान आहे. मात्र, यापूर्वी काही किल्ल्यांवर मद्यपान,ड्रग्ज घेतल्याच्या घटना आढळून आल्या आहेत. व्यसनाधी तरुणाई गड किल्ल्यांवरील मोकळ्या जागेत असेल कृत्य करतात. आता, शासनाने या कृत्याला कायदेशीर लगाम लावला आहे.  याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माहिती दिली. 

विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकांचा व निर्णयांचा धडाकाच सुरू आहे. गेल्या 4 दिवसांत तब्बल 78 शासन निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. त्यात, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 41 विषयांना कॅबिनेटमध्ये मंजुरी दिलीय. त्यामध्ये, गोड्या पाण्यातील मच्छिमारांसाठी तसेच सागरी मच्छिमारांसाठी महामंडळ स्थापन केले जाणार आहे. तर, महत्वाचा निर्णय म्हणजे, गड किल्ल्यांची सुरक्षा व संवर्धन हा आहे. गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्ज घेतल्यास यापुढे 2 वर्षांची शिक्षा व 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच, राज्य सरकारने आज  41 निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अशा वास्तूंना हानी पोहचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे. सध्या, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पूराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष नियम 1960 (1961चा महाराष्ट्र अधिनियम क्र.12) मधील तरतुदींनुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. 1960 सालापासून या दंडात वाढ झालेली नाही. या कायद्यात कठोर तरतुदींचा आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या 1958च्या अधिनियमातील सुधारणांशी सुसंगत अशा तरतूदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. 

शरद पवार 55 वर्षे सत्ते होते

शरद पवार हे स्वत: 55 वर्षे सत्तेत असताना त्यांनी ही कृती केली नाही. आता, निवडणूक तोंडावर आल्यावर ते मागणी करतात, यातून व्यावसायिक राजकारणी ते दिसतात. नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणत शरद पवार यांनी आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला. 

कुणी निर्देश तर दिले नाहीत ना - मुनगंटीवार

चर्चेतून प्रश्न सुटतो असं झिरवळ साहेब सभागृहात म्हणताय. पण, संविधानिक पदावर असताना असे करण्याचे कारण काय? त्यांनी उडी का मारली. निवडणूक आल्यामुळे केले असेल तर योग्य आहे. पण, हे सरकार आदिवासींच्या पाठिशी उभे आहे, असे मुनगंटीवर यांनी स्पष्ट केले. तसेच, उपाध्यक्षांनी बोलवल्यावर मुख्यमंत्र्‍यांना जावे लागते. निवडणूक लक्षात घेवून आंदोलन करतात. कुणी निर्देश तरी दिले नाहीत ना, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा

एकेकाळचे सहकारी भाजपमधून राष्ट्रवादीत, हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयावर अशोक चव्हाण म्हणतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget