एक्स्प्लोर

खाजगी क्लासेससाठी शिक्षण विभागाच्या जाचक अटी, 'माझा'चे सवाल

काही बोगस क्लासेसचं कारण देत राज्याच्या शिक्षण खात्याने क्लासेसवर निर्बंध घालण्यासाठी नव्या नियमावलीचा मसुदा तयार केला आहे.

नागपूर : खरं तर राज्यात फोफावलेल्या खाजगी क्लासेसमुळे गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याचं खरं आहे. पण त्यासाठी राज्याच्या शिक्षण खात्याने काढलेली नवी नियमावली मात्र त्याहूनही भयंकर आहे. खाजगी क्लासेसमधली अनागोंदी कमी करण्याच्या नादात सरकार भ्रष्टाचाराचं नवं कुरण तयार करतंय की काय, अशी शंका येऊ लागली आहे. खाजगी क्लासेस विद्यार्थ्यांसाठी सपोर्ट सिस्टम असतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जे महाविद्यालयात मिळत नाही, ते खाजगी शिकवणीद्वारे विद्यार्थी साध्य करतात. पण काही बोगस क्लासेसचं कारण देत राज्याच्या शिक्षण खात्याने क्लासेसवर निर्बंध घालण्यासाठी नव्या नियमावलीचा मसुदा तयार केला आहे, जो अत्यंत भयंकर आहे. नवा मसुदा आणि माझाचे सवाल
  • नवा नियम- क्लासेसच्या वेळा या शाळा महाविद्यालयांच्या वेळांपेक्षा वेगळ्या असाव्यात
माझाचा सवाल- सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 पर्यंत शाळा असतात मग क्लासेस घ्यायचे कधी?
  • नवा नियम- शिकवण्यांवर धाडी टाकण्याचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना
माझाचा सवाल- यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जाणार नाही का?
  • नवा नियम - शिकवणीबाबत पालक आणि प्रशासनाचे अभिप्राय नोंदवले जातील, त्यावर क्लासेसची मान्यता ठरेल
माझाचा सवाल- मग हा नियम शाळा-महाविद्यालयांना लावणार का?
  • नवा नियम- 18 टक्के जीएसटी व्यतिरिक्त पूर्ण उत्पन्नाच्या 5 टक्के अधिक शिक्षण विकास निधी द्यावा लागेल
माझाचा सवाल- ‘एक देश, एक कर’ असा संकल्प असताना, हा अशक्यप्राय कर क्लासेसना का?
  • नवा नियम- फी ठरवण्याचा अधिकार क्लासेस चालकांना नसेल
माझाचा सवाल- मग हाच नियम शाळा-महाविद्यालयांना का नाही?
  • नवा नियम- फी वाढीचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना असतील
माझाचा सवाल- क्लासेसच्या फी ठरवणारे सरकारी अधिकारी कोण? खाजगी क्लासेसच्या माध्यमातून राज्यात बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. पण म्हणून त्याची शिक्षा प्रामाणिक क्लासेसना का? असा प्रश्नच आहे. या मसुद्याचे कायाद्यात रुपांतर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण त्याला आता राजकीय पातळीवरही विरोध होण्याची शक्यता आहे. खरं तर शासन आणि प्रशासनाने आपल्या शाळांच्या गुणवत्तांची काळजी घेतली असती, तर खाजगी क्लासेसचं पेवच फुटलं नसतं. पण ते कमी करण्याऐवजी असे महान मसुदे तयार करणाऱ्या शिक्षण खात्याने सर्व बाजूंचा विचार करण्याची गरज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget