एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील पाच महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. कृषीपंपांना थ्री फेज वीज पुरवठ्यापोटी महावितरणला अनुदान देण्यास मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने या नवीन विधेयकाचा मसुदा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
1. शेतीतील उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात वन शेती उप-अभियान राबविण्यास मान्यता.
2. शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबविलेल्या विविध योजनांची दखल घेण्यासह त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढविण्यासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार देण्यास मान्यता.
3. महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने व चलित पथ अधिनियम-२०१७ या नवीन विधेयकाचा मसुदा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यास मंजुरी.
4. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषिपंपांना करण्यात आलेल्या 12 तासांच्या थ्री फेज वीजपुरवठ्यापोटी महावितरण कंपनीस अनुदान देण्यास मान्यता.
5. माहिती-तंत्रज्ञान विषयक खरेदी आता GeM पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement