एक्स्प्लोर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
मुंबई: राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयावर एक नजर.
1. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर 14 जिल्ह्यांमध्ये सघन कुक्कुट विकास गटाची (Intensive Poultry Development Blocks) स्थापना करण्याचा निर्णय.
2. राज्यातील पाच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये केवळ महिलांसाठी तेजस्विनी बस या नावाने स्वतंत्र बस व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय.
3. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे ‘स्मार्ट ग्राम’ योजनेत रुपांतर करून ती 2016-17 या वर्षापासून राबविण्याचा निर्णय.
4. मुंबई येथील सर ज. जी. कला महाविद्यालय, सर ज.जी. उपयोजित महाविद्यालय व सर ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालय या तिन्ही शासकीय संस्थांना स्वायत्तता देण्याचा निर्णय.
5. राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांच्या (250 हेक्टर क्षेत्रावरील) व्याप्ती बदलाबाबतचे धोरण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित.
6. विविध प्रवर्गासाठी पाण्याचे क्षेत्रीय वाटप (Sectoral Allocation) निश्चित करण्याच्या निर्णयासह प्रकरण परत्वे बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन.
7. सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन पाटबंधारे महामंडळांमार्फत करण्यासह प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी पाणीपट्टीची रक्कम खर्च करण्यास मान्यता.
8.कला संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय कला महाविद्यालयातील अधिव्याख्याता आणि प्राध्यापकांना द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement