एक्स्प्लोर

विलिनीकरणाचं सोडाच... आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर नाहीत, 'डंके की चोट पर' न्याय मिळवून देण्याची घोषणा करणारे पडळकर-सदाभाऊ- सदावर्ते कुठे आहेत? 

ST Strike: मविआ सरकारमुळे एसटी कर्मचारी आत्महत्या करतात असं सांगणारे अॅड. सदावर्ते, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मवाळ भूमिका घेताना दिसतात. 

मुंबई: सरकार कोणचंही असो.... एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही, कदाचित सरकारच्या मते हा प्रश्न गौण असल्यानेच त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असावं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटीच्या विलिनीकरणासाठी संप करण्यात आला, त्यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) , सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी त्यासाठी रान उठवलं. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं तर हे नेते कुठेच दिसत नाहीत. विलिनीकरणाचं तर सोडाच.... एसटी कर्मचाऱ्यांचा पगारही आता वेळेवर होत नाही. मग त्यावेळी 'डंके के चोट पर' न्याय मिळवून देण्याच्या बाता करणारे एसटी कर्मचाऱ्यांचे 'पुढारी' आता कुठे आहेत असा सवाल उपस्थित होतोय. 

एकेकाळी एसटीच्या विलिनीकरणासाठी संप करणारे कर्मचारी आता फक्त महिन्याचा पगार तरी वेळेवर व्हावा यासाठी झगडताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्याची 16 तारीख उलटून गेले तरी जानेवारीचा पगार झालेला नाही. यावर एसटी कर्मचाऱ्यांचा असंतोष लक्षात घेता त्यांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यसरकारकडून कर्मचाऱ्यांना केवळ बेसिक पगार देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे, त्यांना पूर्ण वेतन मिळणार नाही. 

पडळकर-सदाभाऊ आणि सदावर्ते कुठे गेले? 

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना 29 ऑक्टोबर 2021 रोजी, एसटीचे विलिनीकरण करण्यात यावं यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यानंतर या संपात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उतरले. सोबतीला अॅड. गुणरत्न सदावर्तेंनीही या संपकरी कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र घेऊन या संपात उडी घेतली. 

राज्य सरकारने एसटी संपकऱ्यांची विलिनीकरणाची मागणी अमान्य केली. एसटीसाठी एक महामंडळ असून त्याचं विलिनीकरण केल्यास इतर महामंडळाकडूनही तशी मागणी पुढे येऊ शकते, आणि वस्तुस्थिती लक्षात घेता विलिनीकरणाचा मागणी मान्य होणंही शक्य नव्हतं. त्यानंतर हा संप जवळपास साडेपाच महिने चालला.

संपाच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर हल्लाबोल

एकीकडे एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संप करत असताना दुसरीकडे या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलं. आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल सुरू केला. 

Gopichand Padalkar: काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर? 

काही अधिकारी, कर्मचारी आणि नेत्यांमुळे एसटीमध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय असा आरोप करत गोपीचंद पडळकरांनी याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. गोपीचंद पडळकर यांनी एसटीच्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी पडळकरांनी आझाद मैदानातच ठिय्या मांडला. इतकंच काय त्या ठिकाणी रात्रही काढली. 

Sadabhau Khot: विलिनीकरणासाठी, स्मशानात जा, भुतांशी चर्चा करा: सदाभाऊ खोत

तुम्ही तिकडं बदाम, काजू खाताय आणि तुमचं जमलं की एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यावेळचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कुणाशी चर्चा करायची असा सवाल विचारला होता. त्यावर एसटी विलिनीकरणासाठी स्मशानात जा, भुतांशी चर्चा करा, पण विलिनीकरण कराच असं सदाभाऊ यांनी ठणकावलं होतं. 

Gunratna Sadavarte: डंके की चोट पर... संपकऱ्यांना न्याय मिळवून देणार; अॅड. सदावर्तेंची प्रतिज्ञा

संपकाळात काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांच्या अवस्थेला मविआ सरकार जबाबदार असल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. एसटीचं विलिनीकरण होत नाही यामागे शरद पवारांचा हात आहे, त्यांना आम्ही झुकवणारच असंही ते म्हणाले होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ते एसटी संपकऱ्यांना उघड्यावर सोडणार नाही असंही त्यांनी म्हटले होते. 

संपकाळात शरद पवारांच्या घरावर हल्ला

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची मुख्य मागणी सोडली तर बहुतांश मागण्या त्यावेळच्या सरकारने मान्य केल्या होत्या. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या त्यावेळच्या परिस्थितीला शरद पवारच जबाबदार असल्याचं चित्र निर्माण केलं गेलं आणि त्यांच्या मुंबईतील घरावर हल्लाही करण्यात आला. या हल्ल्यानंतर 118 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. 

पडळकर, सदाभाऊ आणि सदावर्ते आता मवाळ झाले का? 

मविआ सरकार सत्तेत असताना विलिनीकरणासाठी आक्रमक भूमिका घेणारे हे संपकऱ्यांचे हे तीन नेते शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र मवाळ झाल्याचं दिसून येतंय. या तीनही नेत्यांपैकी एकटाही एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून येत नसल्याची परिस्थिती आहे. 

मविआच्या काळात सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप तब्बल साडेपाच महिन्यानंतर मिटला. या काळात एसटी कर्मचाऱ्यांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे हाल तर झालेच पण त्याचसोबत राज्यातील नागरिकांचे अतोनात हाल झाले. आज राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं तरी एसटी कर्मचाऱ्यांची स्थिती काही वेगळी नाही. संप काळात कर्मचाऱ्यांना किमान पगार तरी मिळायचा, आज तोही मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याने मार सहन करावं लागतोय. 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Embed widget