एक्स्प्लोर

ST Employee: एसटी कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप

ST Employee: राज्यातील एसटीचे विभाग नियंत्रक, आगार प्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांना या संदर्भात कर्मचाऱ्यांकडून वचन पत्र लिहून घेण्याबाबत सूचना वरिष्ठांकडून दिल्या आहेत.

Mumbai ST Employee: मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून मुळ वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सरकारच्या मध्यस्थीनं घेण्यात आला आहे. परंतु, वेतन निश्चिती करताना एसटी कर्मचाऱ्यांना वेतन जास्त गेले, तर ते परत करावं लागेल, अशा आशयाचं वचन पत्र प्रशासन लिहून घेत आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याच्या चर्चेच्या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचे कार्य वृत्त प्रसारित करताना केवळ सरकारशी संबंधित काही नेत्यांची नावं टाकण्याच्या अट्टाहासामुळे हा घोळ झाला  आहे. उपस्थित सर्व कर्मचारी संघटनेची नावे तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नावे मिनिट्स मध्ये असती तर व्यक्तिगत कर्मचाऱ्याकडून वचन पत्र घेण्याची गरज भासली नसती. त्या मुळे कर्मचाऱ्यांना जे वचन पत्र लिहून देण्याची सक्ती केली जात आहे. त्यात त्यांची विनाकारण फरफट होत असून हे निव्वळ इतर संघटनाना श्रेय द्यायचं नाही म्हणून चाललं असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे  सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

राज्यातील एसटीचे विभाग नियंत्रक, आगार प्रमुखांसह इतर अधिकाऱ्यांना या संदर्भात कर्मचाऱ्यांकडून वचन पत्र लिहून घेण्याबाबत सूचना वरिष्ठांकडून दिल्या आहेत. कुठल्याही आस्थापनेत मान्यताप्राप्त संघटना किंवा इतर संघटना यांच्या मध्यस्थीने अश्या वेतनवाढीचा करार केला जातो. त्यावर संघटना प्रतिनिधींच्या सह्या घेतल्या जातात.मात्र या वेळी एसटी मधील मान्यताप्राप्त संघटना न्यायालयीन आदेशामुळे सह्या करू शकत नव्हती. पण अश्या वेळी उपस्थित सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या सह्या घेतल्या असत्या तर वेतनवाढीत होणाऱ्या त्रुटींची जबाबदारी त्या संघटनांची राहते. पण सरकारला इतर संघटनांना श्रेय द्यायचे न्हवते. म्हणून मिनिट्स काढताना त्यात उपस्थित संघटनांची नावे जाणीव पूर्वक वगळण्यात आली. त्या मुळेच कर्मचाऱ्यांना वचन पत्र लिहून देण्याची गरज लागली असल्याचंही बरगे यांनी म्हटलं आहे.

एसटीमहामंडळातील कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2020 पासून जाहीर करण्यात आलेल्या वेतनवाढीच्या अनुषंगानं सर्व कर्मचाऱ्यांचे विहित नमुन्यातील वचनपत्र कर्मचाऱ्यांकडून भरुन घेवून ते त्यांचं वैयक्तिक दप्तरामध्ये जतन करून ठेवण्यात यावेत अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. शाखा आणि आगारातील सर्व हजेरी पटावरील कर्मचाऱ्यांकडून या पत्रासोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यातील वचन पत्र तीन प्रतीत भरून प्रवर्गनिहाय पाठविण्यात याव्यात असेही कळविण्यात आले आहे.तसेच, एखादया कर्मचाऱ्यांचे वचन पत्र या कार्यालयास प्राप्त न झाल्यास त्या कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती केली जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे.सदर बाबतीत भविष्यात काही तक्रार उद्भवल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी शाखा आणि आगार प्रमुखांची राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे. हे पूर्णतः चुकीचे आणि नियमबाह्य पद्धतीने चालले असून एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्याबाबत ज्या कर्मचारी संघटनांनी आंदोलन केले त्यांना श्रेय द्यायचे नाही म्हणून हे सरकारच्या दबावाखाली हा सर्व खटाटोप चालला असल्याचेही बरगे यांनी म्हंटलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Ration Card Rules : तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे का? मग तुमचे रेशन कार्ड रद्द होणार
Ration Card Rules : तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे का? मग तुमचे रेशन कार्ड रद्द होणार
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget