![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार: सुभाष देशमुख
सोलापूरचे वैभव आम्हाला परत आणायचे असून त्यासाठी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत असं भाजपचे नेते आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले.
![सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार: सुभाष देशमुख Solapur news Subhash Deshmukh says Sushilkumar Shinde is the political father of Solapur ready to listen his advice सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार: सुभाष देशमुख](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/21082847/Sushilkumar-Shinde-Praniti-Shinde-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहेत, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार असल्याचं वक्तव्य राज्याचे माजी सहकार मंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं. सोलापुरात ज्येष्ठ पत्रकार राजा माने आणि सुधीर महाजन यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्य़क्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सुभाष देशमुख यांनी शिंदे यांचे कौतुक केले.
भाजपचे आमदार माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं तोंडभरुन कौतुक केलंय. भाजप नेते सुभाष देशमुख म्हणाले की, "सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप आहेत. बापाचं वय झालं तर पोराला वाटतं की आत काय बापाचं ऐकायचं? पण बाप हा बापच असतो. बापाचा एक सल्ला मुलाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. सोलापूरचा नागरिक आणि पुत्र म्हणून तुम्ही सांगाल ते ऐकायला तयार आहे. अशा शब्दात आमदार सुभाष देशमुख यांनी सुशीलकुमार शिंदे यांचं कौतुक केलं."
माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सुशीलकुमार शिंदे यांना उद्देशून म्हणाले की, "सोलापुरचे वैभव आम्हाला परत मिळवायचं आहे. आपले खूप चांगले संबंध आहेत. सिद्धरामेश्वर यांची यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेला आपण सिनेकलाकार आणले तर सोलापूरचं मार्केटिंग होईल. सोलापुरात कोटणीस स्मारक आहे. या ठिकाणी आपण चीन मधून लोकांना आणावे. तुमच्या पत्राला वजन आहे. तिथले राजदूत, पंतप्रधान सोलापुरात आले की कोटणीस स्मारक जगभरात पोहोचेल."
दरम्यान राजकीय बाप म्हणून आपण मला सांगाल ते ऐकण्याची माझी तयारी आहे, मात्र राजकीय नव्हे अशी मिश्कील टिप्पणी देखील देशमुखांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Cases : राज्यात आज 13, 452 रुग्णांना डिस्चार्ज, 7,761 रुग्णांची भर; 26 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
- Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल मिळवण्यात येत असलेल्या अडचणीवरुन शिक्षणमंत्र्यांची दिलगिरी; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
- केंद्रापाठोपाठ राज्यातही खातेबदलाचे वारे, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना मिळणार नारळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)