एक्स्प्लोर
वडिलांनीच स्वत:च्या मुलाच्या हत्येची सुपारी दिली, सोलापुरातील घटना
वडिलांनीच स्वत:च्या मुलाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. मुलगा घरात त्रास देत असल्याने वडिलांनी हे पाऊल उचललं. पोलिसांनी या प्रकरणी वडील आणि तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे.
![वडिलांनीच स्वत:च्या मुलाच्या हत्येची सुपारी दिली, सोलापुरातील घटना Solapur Father hires contract killer to murder owne son, arrested वडिलांनीच स्वत:च्या मुलाच्या हत्येची सुपारी दिली, सोलापुरातील घटना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/15184043/solapur-murder.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : घरात त्रास देणाऱ्या मुलाची हत्या करण्याची सुपारी खुद्द वडिलांनीच दिल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. शैलेश सुरेश घोंगडे असं मृताचं नावं आहे. 29 जानेवारीला सोलापुरातील कुंभारी हद्दीत पोलिसांना बेशुद्धावस्थेत एक तरुण आढळला होता. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तपासात वडिलांनीच शैलेशच्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे.
शैलेश घोंगडे घरात खूप त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून वडील सुरेश घोंगडे यांनी मुलाला मारण्यासाठी शेताच्या जवळ राहणाऱ्या शंकर वडजेला दोन लाख रुपयांची सुपारी दिली. सोलापुरातील एका हॉटेलमध्ये त्याच्या हत्येचा कट शिजला. 29 जानेवारी रोजी कुंभारी हद्दीत पोलिसांना शैलेश घोंगडे बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याच्या गळ्याभोवती खुणा आढळल्याने, त्याचा गळा आवळून हत्या केल्याची शंका पोलिसांना आली. त्यानुसार सोलापूर ग्रामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांची चौकशी केली. यामध्ये शैलेशचे वडील सुरेश घोंगडे यांनीच हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की, "शैलेश घरी खूप त्रास देत होता. त्यामुळे शेताजवळ राहणाऱ्या शंकर वडजेला त्याच्या हत्येची सुपारी दिली."
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी वडील सुरेश घोंगडे यांच्यासह शंकर वडजे, संजय राठोड, राहुल राठोड या तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. या चौघांना अक्कलकोट न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)