एक्स्प्लोर

'पुणे, मुंबईतील गॅंगवॉरमार्फत तुम्हाला संपवू अशा धमक्या देताहेत, पोलिस संरक्षण द्या'; आमदारपुत्राची मागणी

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांची सध्या चर्चा राज्यभर होतेय. याचं कारण आहे काल विधानसभेत गाजलेली चर्चा. यावर त्यांचे पुत्र रणवीर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांची सध्या चर्चा राज्यभर होतेय. याचं कारण आहे काल विधानसभेत गाजलेली चर्चा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत आरोप करताना म्हटलं की, राऊत आमच्यासोबत आले म्हणून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जातोय, सोलापुरातही एक 'सचिन वाझे' आहे जो महिन्याला लाखोंची वसुली करतोय असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या सभागृहात सदस्यांनी बोलल्यानंतर त्यांच्यावर प्रशासन डूख धरणार असेल तर सदस्यांनी बोलायचं की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय असंही ते म्हणाले होते. या प्रकरणावर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फेसबुक लाईव्हद्वारे दिल्या जात आहेत धमक्या- रणवीर राऊत 
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  रणवीर राऊत यांनी म्हटलं आहे की, बार्शीतील माजी आमदार दिलीप सोपल यांचे समर्थक भाऊसाहेब आंधळकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे धमकावलं.  फेसबुक लाईव्ह येत पुणे, मुंबईतील गॅंगवॉर यांच्यामार्फत तुम्हाला संपवू अशा वारंवार धमक्या शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दिल्याचा आरोप रणवीर यांनी केलाय.  याचे सर्व पुरावे आम्ही पेन ड्राईवद्वारे पोलिस अधिक्षक कार्यालय, पोलिस निरीक्षक कार्यालय यांना वारंवार पत्रव्यवहार केल्याचा दावा देखील  रणवीर राऊत यांनी केला आहे. मात्र माझ्या मागणीचा गंभीरपणे विचार केला जात नसल्याचा देखील आरोप राऊतांनी केला आहे षडयंत्र रचून माझ्यावर हल्ला करुन मला 302 किंवा 307 सारख्या कलमांतर्गत गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत.  त्यामुळे तात्काळ सशुल्क पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी रणवीर राऊत यांनी केली आहे.  

आमदार विधानसभेत  काय म्हणाले...
काल विधानसभेत बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले होते की, अवैध धंदे करणाऱ्या लोकांना सोलापूर पोलिस संरक्षण देत आहे. आम्ही आवाज उठवला तर आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जातात. माझ्या मुलांना धमक्या दिल्या जात आहेत, ते दोघेही लॉ करत आहेत. त्यांना पोलिस संरक्षणाची मागणी करुन देखील दिलं जात नाही. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचं ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Full PC : दावोसला उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी ?Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघडABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Pushpa 2 Box Office Collection Day 50: 'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रवडलं, कमाई किती?
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रवडलं, कमाई किती?
Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार?  अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता
पगारदारांना दिलासा मिळणार? 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता, अर्थसंकल्पात निर्णय होणार?
Embed widget