मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण महाविकास आघाडी कष्टकऱ्यांना घरे बांधून देणार: उद्धव ठाकरे
Maharashtra Budget Session : घोषणा झाल्या आता कामाला लागणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात बोलताना म्हणाले.
मुंबई: मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचं अंडे देणारी कोंबडी आहे, पण शिवसेनेने तसा कधी विचार केला नाही. मुंबईतील कष्टकऱ्यांना घरे बांधून देण्यासंबंधी राज्य सरकार गांभिर्याने विचार केला असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते सभागृहात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, " 1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरे मिळावीत यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. मुंबईचा विचार हा अनेकदा सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून करण्यात आला. आता त्या कष्टकऱ्यांना घरे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने गांभिर्याने विचार केला आहे. मुंबईसाठी ज्यांनी संघर्ष केला त्यांच्यासाठीचा विचार प्रत्यक्षात या सरकारकडून आणलं जात आहे त्याबद्दल शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मला अभिमान वाटतोय."
धारावीचा पुनर्विकास हा केंद्राच्या धोरणामुळे रखडला असल्याचा आरोप मुख्ममंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचवेळी महाविकास आघाडीचे सरकार कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काची घरं बांधून देणार असल्याचं ते म्हणाले.
आमदारांसाठी 300 घरं
आमदारांसाठी कायमस्वरुपी 300 घर बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. घोषणा झाल्या आता आम्ही कामाला लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलताना सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी छोटं का होईना पण भाषण केलं याचा आनंद आहे असा टोला फडणवीसांनी लगावला. यानंतर फडणवीसांनी मुंबईत झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचून दाखवली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करतंय असं मुख्यमंत्री म्हणतात. मात्र या सरकारने बांधावर जाऊन हेक्टरी 50 हजार रुपये मिळायला हवे असं आश्वासन दिलं होतं, त्याबद्दल आता बोलायला नको. ना नवे प्रकल्प, ना नवे योजना, सुरु प्रकल्प बंद, केवळ टीका, आरोप, टोमणे या पलिकडे काहीच नाही."
संबंधित बातम्या:
- Maharashtra Budget Session : अजितदादा म्हणाले, प्रवीण दरेकर को गुस्सा क्यो आता है? दरेकर म्हणतात...
- विधानपरिषदेत अजित पवारांची टोलेबाजी, तर दरेकर आणि निलम गोऱ्हे यांच्यात खडाजंगी
- The Kashmir Files: तर चित्रपटातून कमावलेले 150 कोटी काश्मिरी पंडितांच्या घरबांधणीसाठी द्यावे: जयंत पाटील
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha