एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Barshi Scam : बार्शीच्या फटे स्कॅममधील मुख्य आरोपी विशाल फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी

सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम' मधील मुख्य आरोपी विशाल फटे सोमवारी स्वत:हून पोलिसांत हजर झाला होता.

Solapur Barshi Froud Case : सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम'(Barshi Scam) ती गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा सुरु होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे हा काही दिवस फरार देखील होता. दरम्यान सोमवारी स्वत:हून पोलिसांत हजर झाल्यानंतर फटे याला आज बार्शी न्यायालयात हजर केले होते. याठिकाणी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर फटे याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी आरोपी विशाल फटे याने स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली दिली आणि रात्री तो पोलिसांत हजर देखील झाला. ज्यानंतर आज (मंगळवारी) त्याला बार्शी न्यायालयात हजर केले गेले. यावेळी फटेच्या वकिलांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने कमी दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला. पण याला विरोध करत सरकरी वकिल प्रदीप बोचरे यांनी पोलिसांची बाजू मांडली. ज्यानंतर अखेर न्यायालयाने फटे याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

काय घडलं कोर्टात?

आरोपी विशाल फटे याचे वकील विशाल बाबर यांनी त्याची बाजू मांडली. 'आरोपी तपासला सहकार्य करणारा आहे, त्यामुळे तो स्वतःहून हजर झाला आहे. त्याने लोकांना फसवलेले नाही. फसवणूक झालेल्यांचा जो आकडा सध्या सांगितला जात आहे तो फुगवलेला आकडा आहे. तक्रार करणाऱ्यांनी तक्रारीमध्ये आरोपीचा फोन लागत नाही, तो सापडला नाही अशी तक्रार केली आहे. एकानेही दिलेल्या मुदतीत पैसे परत दिले नाही अशी फिर्याद दिलेली नाही. तसंच आरोपी हा न्यायप्रिय आहे त्यामुळे तो तपासला सहकार्य करेल, म्हणून पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवाद बाबर यांनी केला. 

पण याला प्रतित्यूर देत सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनी आरोपी विशाल फटेचे सर्व गुन्हे यावेळी सांगितले. 'त्याने लोकांना मोठ्या परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला त्याने लोकाना परतावा देखील दिला, मात्र जेव्हा अशक्य झाले तेव्हा इथून पळून गेला. सुमारे 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपीने 3 विविध कंपन्या सुरू केलेल्या होत्या, आणखी काही फसवणूक त्याने केली आहे का? याचाही तपास सुरु आहे. दरम्यान त्याने पैशांचे नेमके काय केले? याचा शोध होण्यासाठी पोलीस कस्टडीची गरज आहे. प्रदीप यांच्या या युक्तिवादानंतर त्यांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. 

कोट्यवधींचा स्कॅम 

आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून तो मागील काही दिवासांपासून फरार होता. फटेने बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींची फसवणूक केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 75 हून अधिकजणांची विशालने 18 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

'मी भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन'

विशाल फटे याने पोलिसांत हजर होण्यापूर्वी सोमवारी सकाळी एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरणावर त्याचं स्पष्टीकरण देत त्याची बाजू मांडली होती. यात तो म्हणाला, 'मला लोकांचे पैसे बुडवायचे नाहीत. मी जेलमध्ये जरी गेलो तरी जेलमधून बाहेर आल्यावर मी लोकांचे पैसे देईन. मी भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन. एकाचाही एक नया पैसा देखील माझ्याकडून बुडणार नाही याची खात्री देतो. मी जाणूनबुझून केलेलं नाही.' असंही तो म्हणाला.

पुढे बोलताना फटे म्हणाला, 'मी एका दिवसात 4 लाखाचे 54 लाख केलेला माणूस आहे. ते ही ट्रेडिंगमध्ये, लोकांना स्क्रिनसमोर उभं करुन केलेलं आहे. डॉक्टर, अधिकारी माझे क्लायंट आहेत. त्यांना सगळं माहित असतं. पण मला त्रास द्यायचा म्हणून हे सगळं केलं. मला शोधायची गरज नाही, मी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होणार आहे. माझ्यावर जी कायदेशीर कारवाई होईल त्यासाठी मी तयार आहे. या गोष्टीमुळं मी इतका प्रेशर खाली आलोय की मी माझी बायको आणि लेकरासह आत्महत्या करायला चाललो होतो. एवढी इज्जत गेलीय. मला मरणं सोपं वाटत होतं. दीड वर्षाच्या मुलीसह मरायची तयारी होती माझी. या सगळ्या गोष्टीला मी एकटाच जबाबदार आहे. लोकांना माझ्यावर विश्वास असेल त्यांनी वाट पाहा, ज्यांना विश्वास नसेल त्यांनी केसेस करा. मला पळून जायचं नव्हतं आणि जाणार नाही.'

'हवतंर पळालो असातो'

या व्हिडीओत पुढे बोलताना फटे म्हणाला 'मी कुठलाही कमिशन नेमलेला नव्हता. माझ्या चुकीमुळं ही गोष्ट झालीय, मी जे झालंय ते स्वीकारलं आहे. शिक्षा झालीय ती भोगायला मी तयार आहे. माझ्या घरच्यांनी माझ्या ऑफिसला कधीच भेटही दिली नाही. माझा बाप, आई साधी माणसं, मी एकटा सोडलो तर कुणाचाही यात सहभाग नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. मला पळूनच जायचं असतं तर मी आधीच तयारी केली असती. ब्लॅकनं व्हिजा काढला असता आणि दुबईला गेलो असतो. मी पळायचं असतं तरी आरामात पळालो असतो.' 

हे ही वाचा - 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Supriya Sule Baramati Speech : विजयानंतर सुप्रिया सुळेंचं बारामतीत पहिलं भाषण; काय म्हणाल्या?ABP Majha Headlines : 06 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVishal Patil on Congress Meeting :  अपक्ष खासदार विशाल पाटलांची काँग्रेसच्या बैठकीला उपस्थितीJitendra Awhad on Powai Case : मनपाच्या कारवाईवर आव्हाडांचा संताप, खाजगी बाऊन्सरला बाहेर काढलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
कसं पिकवावं... सोयाबीनला बाजारात 4 हजाराचा भाव, पण सोयाबीन बियाण्याची विक्री 10 हजाराला
Nashik Teachers Constituency :  'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
'सेम टू सेम' नावाचा उमेदवार दिसताच राडा, महायुतीच्या किशोर दराडेंकडून अर्ज भरताना मारहाणीचा आरोप
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
धक्कादायक! जळगावातील तीन विद्यार्थ्यांचा रशियामध्ये नदीत बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
एकीकडे राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी', दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
Embed widget