एक्स्प्लोर

Barshi Scam : बार्शीच्या फटे स्कॅममधील मुख्य आरोपी विशाल फटे पोलिसांत हजर, मंगळवारी न्यायालयात करणार हजर

सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम'मधील मुख्य आरोपी विशाल फटे स्वत:हून पोलिस स्थानकात हजर झाला आहे.

Solapur Barshi Froud Case : मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम'ची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु होती. तपासासाठी एक विशेष पथक स्थापन होताच आरोपी विशाल फटे याने स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली देत तो पोलिसांत हजर देखील झाला. दरम्यान पोलिसांनी त्याला त्वरीत अटक करत शासकीय रुग्णालयात त्याची आरोग्य तपासणी केली. आरोग्य तपासणीनंतर आता उद्या (मंगळवारी) त्याला बार्शी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून तो मागील काही दिवासांपासून फरार होता. फटेने बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींची फसवणूक केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 75 हून अधिकजणांची विशालने 18 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

'मी भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन'

विशाल फटे याने पोलिसांत हजर होण्यापूर्वी सोमवारी सकाळी एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरणावर त्याचं स्पष्टीकरण देत त्याची बाजू मांडली होती. यात तो म्हणाला, 'मला लोकांचे पैसे बुडवायचे नाहीत. मी जेलमध्ये जरी गेलो तरी जेलमधून बाहेर आल्यावर मी लोकांचे पैसे देईन. मी भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन. एकाचाही एक नया पैसा देखील माझ्याकडून बुडणार नाही याची खात्री देतो. मी जाणूनबुझून केलेलं नाही.' असंही तो म्हणाला.

पुढे बोलताना फटे म्हणाला, 'मी एका दिवसात 4 लाखाचे 54 लाख केलेला माणूस आहे. ते ही ट्रेडिंगमध्ये, लोकांना स्क्रिनसमोर उभं करुन केलेलं आहे. डॉक्टर, अधिकारी माझे क्लायंट आहेत. त्यांना सगळं माहित असतं. पण मला त्रास द्यायचा म्हणून हे सगळं केलं. मला शोधायची गरज नाही, मी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होणार आहे. माझ्यावर जी कायदेशीर कारवाई होईल त्यासाठी मी तयार आहे. या गोष्टीमुळं मी इतका प्रेशर खाली आलोय की मी माझी बायको आणि लेकरासह आत्महत्या करायला चाललो होतो. एवढी इज्जत गेलीय. मला मरणं सोपं वाटत होतं. दीड वर्षाच्या मुलीसह मरायची तयारी होती माझी. या सगळ्या गोष्टीला मी एकटाच जबाबदार आहे. लोकांना माझ्यावर विश्वास असेल त्यांनी वाट पाहा, ज्यांना विश्वास नसेल त्यांनी केसेस करा. मला पळून जायचं नव्हतं आणि जाणार नाही.'

'हवतंर पळालो असातो'

या व्हिडीओत पुढे बोलताना फटे म्हणाला 'मी कुठलाही कमिशन नेमलेला नव्हता. माझ्या चुकीमुळं ही गोष्ट झालीय, मी जे झालंय ते स्वीकारलं आहे. शिक्षा झालीय ती भोगायला मी तयार आहे. माझ्या घरच्यांनी माझ्या ऑफिसला कधीच भेटही दिली नाही. माझा बाप, आई साधी माणसं, मी एकटा सोडलो तर कुणाचाही यात सहभाग नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. मला पळूनच जायचं असतं तर मी आधीच तयारी केली असती. ब्लॅकनं व्हिजा काढला असता आणि दुबईला गेलो असतो. मी पळायचं असतं तरी आरामात पळालो असतो.' 

हे ही वाचा - 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special ReportNashik Accident | नाशिकमध्ये भीषण अपघात पाच जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget