एक्स्प्लोर
Advertisement
जगा अन् जगू द्या..! इंदोरीकर विरोधकांना सिंधुताई सपकाळ यांची भावनिक साद
कीर्तनात वादग्रस्त वक्तव्यानंतर निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यानंतरही त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीय. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकरांच्या समर्थनात भूमिका घेतली.
शिर्डी : एका वक्तव्याचं किती भांडवल करणार, किती वाद घालणार? त्याने काही खून केला नाही, अशी प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकर महाराजांवर दिलीय. समाजप्रबोधनात इंदोरीकरांचं मोठं योगदान आहे, असही त्यांनी म्हटलंय. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, अजूनही त्यांच्या वक्तव्यावरुन तृप्ती देसाई आक्रमक असून आपल्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना त्यांनी नोटीस पाठवली आहे. यावर आता ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत जगा आणि जगू द्या, अस आवाहन केलय.
कोपरगाव शहरात नगरपालिकेच्या वतीनं महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित व्याख्यानाला सिधुताई सपकाळ आल्या होत्या. आईच्या काळजातून या विषयावर व्याख्यान झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना सिंधुताई यांनी इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याबाबत जगा आणि जगू द्या असं आवाहन केलंय. एका वक्तव्याच किती भांडवल करणार? किती वाद घालणार?, असा सवाल करत त्याने काही खुन केला नाही. इंदोरीकर महाराजांचे मोठे योगदान असून अनेक व्यसनाधीन तरुण इंदोरीकरांच्या प्रबोधनाने चांगल्या मार्गाला लागलेत. माणसातला माणुस त्यांनी घडवला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफीही मागितलीय. त्यामुळे आता किती वाद वाढवणार? जगा आणि जगू द्या, अशी भावनिक साद सिंधुताई सपकाळ यांनी इंदोरीकर विरोधकांना घातलीय.
कोल्हापुरात इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम अखेर रद्द
इंदोरीकर यांना तृप्ती देसाईंची वकिलामार्फत कायदेशीर नोटीस -
तृप्ती देसाई यांनी वकिलामार्फत इंदोरीकरांना नोटीस धाडली आहे. इंदोरीकरांनी तातडीनं महिला वर्गाची माफी मागावी अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असा इशारा तृप्ती देसाईंनी दिलाय. यापूर्वी तृप्ती देसाईंनी अहमदनगर पोलीस अधीक्षकांकडे इंदोरीकरांविरोधात तक्रार अर्ज दिला होता.
...तर दहा दिवसात इंदोरीकर महाराजांवर न्यायालयात गुन्हा दाखल करणार, तृप्ती देसाईंची नोटीस
इंदोरीकरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता -
इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण इंदोरीकरांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.. इंदोरीकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हीडिओत इंदोरीकरांनी जातीवाचक विधान करत समाजात तेढ निर्माण होईल असं विधान केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केलाय. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांत लेखी फिर्याद दाखल केलीय. या संदर्भात चौकशी करुन दोन दिवसात योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय.
Indurikar Maharaj | इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन : तृप्ती देसाई | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement