एक्स्प्लोर

कोल्हापुरात इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम अखेर रद्द

कोल्हापुरात होणारा इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. इंदोरीकर महाराजांना वेळेत पोहोचणं शक्य नसल्याने कार्यक्रम रद्द केल्याचं आयोजकांनी सांगितलं.

कोल्हापूर : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराजांना वेळेत पोहोचणं शक्य नसल्याने कार्यक्रम रद्द केल्याचं आयोजकांनी सांगितलं. तसंच कोणत्याही संघटनेच्या दबावाला बळी पडलो नसल्याचाही दावा त्यांनी केला. याशिवाय तीन महिन्यानंतर पुन्हा विद्यापीठच्या बाहेर कार्यक्रम घेणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं.

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. याला कोल्हापुरातील पुरोगामी संघटनांनी विरोध केला होता. इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा पुरोगामी संघटनांनी दिला होता. स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा कार्यक्रम विद्यापीठात, नको अशी भूमिका अंनिस आणि पुरोगामी संघटनांनी घेतली होती.तर, दुसरीकडे कार्यक्रम घेणारच अशी भूमिका कोल्हापूर युवा सेनेनी घेतलीय. परिणामी पुरोगामी संघटना आणि कोल्हापूर युवा सेना आता आमने-सामने आल्या होत्या. त्यानंतर काही तासातच इंदोरीकर महाजारांचा कार्यक्रम रद्द केल्याचं आयोजिकांनी सांगितलं.

शिवाजी विद्यापीठातील इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला विरोध

इंदोरीकर महाराज वादात गेल्या काही दिवसांपासून आपल्या एका वक्तव्यावरुन कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर वादात आहेत. ओझर इथे आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या प्रकरणी अहमदनगरच्या PCPNDT समितीने त्यांना नोटीस पाठवली होते. वादानंतर त्यांनी पत्रक जारी करुन दिलगिरीही व्यक्त केली होती.

निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले? 'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.'

वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांची अखेर दिलगिरी

इंदोरीकर महाराजांचं वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचं समितीच्या सदस्याने म्हटलं आहे. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इतकंच नाही तर या नोटीसनंतर जर पुरावे मिळाले तर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.

Indurikar Maharaj | इंदोरीकरांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमाला अंनिस आणि पुरोगामी संघटनांचा विरोध

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Jain Muni Nileshchandra on Raj Thackeray: तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य
तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य
Ketan agrawal: लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
Abhimanyu Pawar On Medha kulkarni: खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Narendra Patil : ...तितक्यात ताई उठल्या आणि कॉन्ट्राव्हर्सी झाली, अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी घटनाक्रम सांगितला..
अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी सर्व घटनाक्रम सांगितला..
Ketan Agarwal Death Case :
"केतनच्या मृत्यूनंतर सियाने घरी काय सांगितलं? हावभाव कसे होते?", गुपितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी भावाला बोलवलं, काय-काय दिली माहिती?
Kolhapur Football : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
Medha Kulkarni: जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
Embed widget