सतीश सावंत यांच्या पराभवानंतर अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंची पोस्ट; म्हणाले, 'गाडलाच'
Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे.
![सतीश सावंत यांच्या पराभवानंतर अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंची पोस्ट; म्हणाले, 'गाडलाच' Sindhudurg District Bank Election Facebook Post of Nitesh Rane who was in hiding after defeat of Satish Rane सतीश सावंत यांच्या पराभवानंतर अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंची पोस्ट; म्हणाले, 'गाडलाच'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/31/017bdf2f6eb57f25e2b1499c6a305637_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून जिल्हा बँकेवर भाजपचाच झेंडा फडकला आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. परंतु, त्यांच्या अधिकृत फेसबुक पेसवरुन निवडणूक निकालांसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जोरदार चूरस रंगली होती. महाविकास आघाडीला 4 तर, भाजपला 4 जागा मिळाल्यात. कणकवलीत अटीतटीच्या लढतीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झालेत. सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समसमान मतं मिळाल्यानं ईश्वर चिठ्ठीने निकाल जाहीर केला आणि नशिबाची साथ भाजपच्या विठ्ठल देसाईंना मिळाली. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन 'गाडलाच' या आशयाची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये भाजप आमदार नितेश राणे सतीश सावंत यांच्या मानेवर उभे राहिले आहेत. या पोस्टरवर 'गाडलाच' असं कॅप्शन लिहिलं आहे.
भाजपचं वर्चस्व, महाविकास आघाडीला धक्का
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे.
कणकवलीतून भाजपचे विठ्ठ्ल देसाई विजयी झाले. समसमान मतं मिळाल्यानं चिठ्ठी टाकून हा निकाल जाहीर झाला. यात विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे गेल्यावेळी बिनविरोध निवडून आले होते. यंदा मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व दिसत असलं तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला. याठिकाणी वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक विजयी झाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)