(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लॉकडाऊन काळात मुलांच्या मानसिक स्थितीत लक्षणीय बदल; सर्व्हेक्षणातून माहिती समोर
नैसर्गिक आपत्ती व कोरोना परिस्थितीचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झालेलं एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. यात चिडचिडेपणा, राग व अतीसंताप ही सर्वाधिक लक्षणे आहेत. सांगलीतील शुश्रुषा संस्थेने हे सर्व्हेक्षण केलं आहे.
सांगली : जिल्ह्यात महापूर, लॉकडाऊन व सध्याच्या कोरोनाची अनिश्चित परिस्थिती याचा सर्वाधिक मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीतील इस्लामपूर मधील ‘शुश्रुषा’ सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेच्या मानसतज्ज्ञांनी जिल्ह्यातील पंधरा वर्षांपर्यंतच्या एकूण 8892 मुला-मुलींचा मानसशास्त्रीय अभ्यास व सर्वेक्षण केले. यातील तीव्र स्वरूपाच्या मानसिक, भावनिक, वर्तणूक, शैक्षणिक समस्या असणाऱ्या मुलांमधील विविध मानसिक व मनोसामाजिक लक्षणांचा शोध घेतला.
यात 85 टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा, 57 टक्के राग व अती संताप, 52 टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर 51 टक्के मुलांमध्ये सर्वाधिक अतीचंचलतेचे प्रमाण असल्याचे दिसून आले असल्याची माहिती ‘शुश्रुषा’ संस्थेचे अध्यक्ष मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिली. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लॉकडाऊन करण्यात आलं. कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद झाले. यामुळे मुले शाळेत न जाता घरामध्ये लॉक झाली. या लॉकडाऊनच्या काळात 85 टक्के मुलांचा चिडेचिडेपणा वाढला असून 57 टक्के मुले रागीट बनल्याचे एका सर्वेक्षणातुन समोर आले आहे. इस्लामपूर येथील शुश्रूषा संस्थेने सांगली जिल्ह्यातील 102 गावांतील मुलांच्या नुकत्याच केलेल्या पाहणीत हा बदल निदर्शनास आलाय.
मुलांच्या मनाचा अभ्यास करताना या संस्थेने सांगली जिल्ह्यातील 102 गावांतील तब्बल 8 हजार 892 मुलांशी संवाद साधला. यामध्ये कोरोनाची भीती, घरातील दडपण, टाळेबंदीमुळे व्यक्त होण्यात आणि खेळण्या-बागडण्यावर आलेले निर्बंध या साऱ्यांचा विचार करत मुलांचे भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलांमधील विविध मानसिक व मनोसामाजिक लक्षणांचा शोध घेतला. यामध्ये मुलांमधील मानसिक, भावनिक वर्तनात तीव्र स्वरूपात बदल झाल्याचे लक्षात आले. या काळात 85 टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा आला होता. 57 टक्के मुलांमध्ये राग व अती संताप, 52 टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी, तर 51 टक्के मुलांमध्ये सर्वाधिक अतिचंचलतेचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले असल्याची माहिती समोर आलिय. या संशोधनात्मक सर्वेक्षणाबाबत तज्ज्ञ व प्रशिक्षित 25 मानसोपचारतज्ज्ञांनी सहभाग घेतला. या तज्ज्ञांनी 9 हजार 85 कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पालक व मुलांशी संवाद साधला.
लॉकडाऊनमध्ये मुलांच्यात झालेले बदल
मुलांमध्ये अकारण भीती, वारंवार रडणे, कमी झोप, मुलामध्ये न मिसळणे, अंथरूण ओले करणे, अंगठा चोखणे, नखे खाणे, बोलताना अडखळणे, हातपाय थरथरणे, अकारण डोके व पोटदुखी अशा अनेक भावनिक, मनोशारीरिक तक्रारींबरोबरच चिडचिडेपणा, अतिचंचलता, राग व अतिसंताप, एकाग्रतेचा अभाव व लक्षात न राहण्याच्या सर्वाधिक जास्त समस्या दिसून आल्या आहेत.
Coronavirus | मिरज कोविड रुग्णालयातील 50 कर्मचारी कोरोनाबाधित