एक्स्प्लोर

नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

श्रीपाद छिंदम यांना भाजपने पक्षातून बडतर्फ केली असून, छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.

अहमदनगर : अहमदनगरमध्ये भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या क्लिपमुळे सध्या अहमदनगर शहरात तणाव निर्माण झाला आहे. भाजपचे नेते असलेले श्रीपाद छिंदम हे अहमदनगरचे उपमहापौर आहेत. या कथित क्लिपमध्ये एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना छिंदम यांनी फोन केला, यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, या क्लिपनंतर शहरात तणाव निर्माण झाला आहे. श्रीकांत छिंदम यांच्याविरोधात राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला, तर शिवसेनेनंही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेध केला आहे. या क्लिपमुळे शिवसेना आणि भाजपमधला अंतर्गत तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. छिंदम यांच्यावर भाजपची कारवाई “शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.” अशी माहिती भाजपचे नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी दिली. श्रीपाद छिंदम नेमकं काय म्हणाले? अशोक बिडवे – हॅलो साहेब... श्रीपाद छिंदम – बिडवे, काल माणसं आले नाही बरं का... अशोक बिडवे – काल किन्नर साहेब बोलले ना तुम्हाला, मी पण त्यांना बोललो होतो. श्रीपाद छिंदम – पाठवणार आहे, का नाही तेवढं सांग फक्त. बाकी कोणाचं नाव नको सांगू. अशोक बिडवे – बरं.. बरं.. पाठवतो. हे शिवजयंती होऊ द्या ना साहेब... श्रीपाद छिंदम – ते गेलं ##$%@##... तू काय शिवाजीच्या ##$%@##? अशोक बिडवे – अहो साहेब... सकाळी सकाळी चांगलं बोला... श्रीपाद छिंदम – मग... अशोक बिडवे – असं बोलतात काय सर.. तुम्हाला बोलतोय ना की माणसं नाहीयेत,  शिवजयंती होऊ द्या... श्रीपाद छिंदम – माझं घरचं काम आहे ते... अशोक बिडवे – मग तुम्ही नीट बोला ना राव... श्रीपाद छिंदम – मग एक काम कर ना... शिवजयंतीचा इतका पुळका आहे, तर एक-दोन माणसं वाढून घे ना पालिकेतून... अशोक बिडवे – माणसं नाहीत म्हणून... पण तुमचं काम केलं नाही का कधी? श्रीपाद छिंदम – माणसं पाठव, बाकीचं नको सांगू तू.... बातमीचा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Gokul President Election 2026: गोकुळवर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती योग्य की अयोग्य?; अँड. श्रीकृष्ण गणबावले यांची चक्रावणारी माहिती
गोकुळवर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती योग्य की अयोग्य?; अँड. श्रीकृष्ण गणबावले यांची चक्रावणारी माहिती
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
MPSC News : एमपीएससीच्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी; निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन
एमपीएससीच्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी; निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Embed widget