एक्स्प्लोर
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम
श्रीपाद छिंदम याने अहमदनगरचे महापौर, मनपा आयुक्त आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवले आहे.
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनावधनाने केलेल्या दुर्दैवी वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे माफी मागतो आणि प्रायश्चित्तास तयार आहे, अशा आशयाचे पत्र श्रीपाद छिंदम याने अहमदनगरचे महापौर, मनपा आयुक्त आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षांना पाठवले आहे.
पत्रात छिंदम नेमकं काय म्हणाला?
“महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनावधनाने केलेल्या दुर्दैवी वक्तव्यामुळे सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. मी केलेले वक्तव्य हे निश्चितच माफीलायक नाही. तीरीही मी सर्व जनतेची हात जोडून माफी मागतो आहे. यासाठी मला जे प्रायश्चित्त करावे लागेल, त्यास मी तयार आहे व केलेल्या वक्तव्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मी अहमदनगर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाचा राजीनामा देत आहे.”, असे श्रीपाद छिंदमने पत्रात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
अहमदनगरचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची कथित क्लिप समोर आली आहे. एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना छिंदमने फोन केला, यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली.
छिंदमवर भाजपची कारवाई
“शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.” अशी माहिती भाजपचे नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
संबंधित बातम्या :
शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे
श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत
नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement