एक्स्प्लोर
शिवस्मारकासाठी कोणत्या जिल्ह्यातून काय आणलं?

मुंबई: मुंबईत अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या भूमीपूजनासाठी आज महाराष्ट्रभरातून माती आणि पाणी मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून माती आणि पाण्याचे 72 कलश शुक्रवारी मुंबईत दाखल होतील.
- जळगावमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तापी, पूर्णा, गिरणा, पांझरा आणि बोरी नद्यांचं पाणी संकलित केलं.
- तर संत मुक्ताई, चांगदेव, सखाराम महाराज आणि असीरगडमधली मातीही एकत्र केली.
- कोल्हापुरातल्या पन्हाळा, विशाळगड, सामानगड, भुदरगड, रांगणा अशा किल्ल्यांवरची माती, आणि पंचगंगा, कृष्णेच्या संगमाचं जल संकलित करण्यात आलं.
- नांदेडमधल्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरची माती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संकलित केली.
- तर अहमदनगरमध्ये मुळा, प्रवरा आणि सीना नदीचं जल, तर प्रेमगिरी किल्ली, विश्रामगड, भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि खर्डा किल्ल्यातली माती संकलित करण्यात आली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























