एक्स्प्लोर

Shivshahi Bus : शिवशाही बस बंद होणार की सुरुच राहणार? एसटी महामंडळाकडून पहिल्यांदाच मोठा खुलासा

Shivshahi Bus and ST mahamandal : शिवशाही बस बाबत एसटी महामंडळाने मोठा खुलासा केलाय.

Shivshahi Bus and ST mahamandal : "गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अपघाताच्या बातम्या येत असताना राज्याभरात वेगाने धावणारी शिवशाही बस बंद होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, सातत्याने पसरत असलेल्या अफवांवर अखेर एसटी महामंडळाने पडदा टाकलाय. "एसटी महामंडळाकडे सध्या 792 शिवशाही(वातानुकूलित )बसेस सुरु आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही", असं स्पष्टीकरण एसटी महामंडळाकडून देण्यात आलं आहे. 

शिवशाही बसेसची सेवा अविरतपणे सुरु राहणार 

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण 792 शिवशाही बस आहेत. त्यापैकी 500 बस धावत असून उर्वरित 392 बस कार्यशाळेत विविध कारणांसाठी दाखल झाल्या आहेत. शिवशाही बस या वातानुकूलित असतात. मात्र आता त्याचे लालपरीत रुपांतर करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती.. शिवशाहीचे रूपांतर साध्या बसमध्ये केले जाणार असल्याचेही बोलले जात होते. मात्र, एसटी महामंडळाकडून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शिवशाही बसेसची सेवा अविरतपणे सुरु राहणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

कधी सुरु झाली होती शिवशाहीची बस सेवा?

शिवशाही ही बस प्रथम 10 जून 2017 रोजी मुंबई-राजगिरी मार्गावर धावली होती. तत्कालीन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात शिवशाही बसेस धाऊ लागल्या. त्यात महिलांना निम्म्या तिकीटाची सुविधा मिळू लागल्याने शिवशाही बस जोरात धाऊ लागल्या. निम्मा दरात वातानुकूलित बसची सुविधा मिळत असल्याने महिला  शिवशाही बसचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. 

गोंदियामध्ये झाला होता शिवशाही बसचा मोठा अपघात 

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात 29 नोव्हेंबर रोजी भंडारा डेपोच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला होता. दरम्यान, शिवशाहीच्या या अपघातात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये शिवशाही बसच्या अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. गोदिंया अपघात प्रकरणी एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय अधिकाऱ्यांनी चालकाला निलंबित केले होते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 100 टक्के भाकरी फिरवण्याची वेळ, माझ्यावर राज्य पातळीवर जबाबदारी दिली तर स्वीकारणार, रोहित पवारांचा निर्धार

Devendra Fadnavis : शाळेत बॅक बेंचर, शांत अन् लाजाळू, पण मित्रांसाठी काहीही करायला तयार; 'विद्यार्थी' देवेंद्र फडणवीस कसे होते?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025Swargate Bus Crime : स्वारगेट प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 26 February 2025Swargate Bus Depo Crime : आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची आरोपीची तरुणीला धमकी, धक्कादायक माहिती समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget