एक्स्प्लोर

राष्ट्रपती राजवटीची भाषा करणं हा जनादेशाचा अपमान : संजय राऊत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य भाजप नेते मुनगंटीवार यांनी केले होते. याच वक्तव्याचा संजय राऊत यांनी आज खरपूस समाचार घेतला आहे. 'राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का?' असा सवाल राऊत यांनी भाजपला विचारला आहे

मुंबई : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल (01 नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलताना लवकरात लवकर सत्तास्थापन झाली नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य केले होते. मुनगंटीवार यांच्या याच वक्तव्याचा संजय राऊत यांनी आज खरपूस समाचार घेतला.  'राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का?' असा राऊत यांनी सवाल भाजपला विचारला आहे. संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापनेस विलंब झाला आहे. अनेक भाजपशासित राज्यांमध्येदेखील असे घडले आहे. तसेच महाराष्ट्रातदेखील सत्तास्थापनेस उशीर झाला आहे. त्यामुळे अशा वेळी राष्ट्रपती राजवटीची धमकी देणं भाजपला शोभत नाही. भाजपची ही धमकी लोकशाहीविरोधी आहे. संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रपती राजवटीची भाषा करणे, हा निवडणुकीतील जनादेशाचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने महायुतीला मतदान करुन उमेदवार निवडून दिले आहेत. परंतु या जनादेशाचा आदर करुन सत्तास्थापन करण्याऐवजी राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे. राष्ट्रपतींच्या पदाची प्रतिष्ठा घालवू नका, असा सल्लादेखील राऊत यांनी भाजपला दिला आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आतापर्यंत आठ दिवस उलटून गेले आहेत. परंतु अद्याप राज्यात कोणत्याही पक्षाने सत्तास्थापन केलेली नाही. राज्यात भारतीय जनता पक्षाचे 105 (11 अपक्षांच्या पाठिंब्यानंतर 116)आणि शिवसेनेचे 56 (7 अपक्षांच्या पाठिंब्यानंतर 63) आमदार निवडून आले आहेत. राज्यातल्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे, परंतु शिवसेना भाजपमधील मंत्रीपदांच्या वाटपावरुन कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे अद्याप राज्यात सत्तास्थापन झालेली नाही. शिवसेनेने भाजपकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. भाजपला मुख्यमंत्रीपद सोडवत नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चादेखील होत नाहीये. याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर विविध चर्चांना उधाण आले आहे. पाहा काय म्हणाले संजय राऊत? राष्ट्रपती राजवटीची धमकी? मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसेना खासदार संजय राऊतांचा पुनरुच्चार | मुंबई | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Embed widget