(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझ्या घरावर हल्ले करून झाले, आता माझ्यावर काहीही कारवाई करा मी लढाईसाठी तयार आहे : चित्रा वाघ
शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक (Shivsena Leader Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेने आता भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh ) यांच्यावर आरोप केले आहेत. पीडितेच्या आरोपांवर चित्रा वाघ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Chitra wagh : "शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचीक (Shivsena Leader Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेत्या पाठिशी उभा राहिल्यानंतर माझ्या घरावर लोकांनी हल्ले केले. आता माझ्यावर आरोप होत आहेत. परंतु, मी सर्व प्रकारच्या चौकशीला तयार आहे. या प्रकरणी माझ्यावर काहीही कारवाई करा, लढण्यासाठी मी तयार आहे, असे भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh ) यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचीक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरूणीने आता या प्रकरणी चित्रा वाघ यांच्यावर आरोप करत एक गौप्यस्फोट केला आहे. " या प्रकरणात विशिष्ट जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले, असा गौप्यस्फोट पीडित तरूणीने केला आहे. तरूणीच्या या गौप्यस्फोटानंतर चित्रा वाघ यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
"पीडित तरूणीने माझ्यावर असे आरोप का केले हे मला समजत नाही. या प्रकरणी मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. पीडित तरूणी एकटीच लढत होती. त्यावेळी तिला कोणीही मदत करत नव्हते. त्यामुळे मी तिला मदत केली. तिने स्वत:हून माझ्याशी संपर्क केला. तिच्यासोबत जे घडलं ते सर्व तिने मला सांगितलं. एका मुलीचा फोन आला आणि मला मदत मागितली. पीडित तरूणीसोबत लढले ही चूक केली का? असा प्रश्न उपस्थित करत माझ्यावर झालेल्या आरोपांवर उत्तर देणार असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, "18 आणि 19 तारखेला माझी आणि पीडितेची भेट झाली होती. त्यावेळी पीडितेने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार मला सांगितला. पीडित मुलगी एकटी लढत होती म्हणून तिच्यामागे उभा राहिले. त्यावेळी कोणत्याही पक्षाने तिला मदत केली नाही. परंतु, आज माझ्यावर आरोप झाल्यानंतर सर्वजण धावून आले आहेत. ती कोणत्या मजबुरीतून बोलत आहे हे मला माहीत नाही. माझ्यावर आरोप करून माझा आवाज बंद करत असाल तर माझा आवाज बंद होणार नाही."
महत्वाच्या बातम्या
रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करण्यासाठी चित्रा वाघ यांचा दबाव; पीडितेच्या आरोपाने खळबळ
Pune Crime : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल