Pune Crime : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
Pune Crime News : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 24 वर्षीय तरुणीनं कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुनच पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचं आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं, असा आरोप या तरुणीनं तक्रारीत केला होता. त्यानुसार पोलिसांनी कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra | FIR registered against Shiv Sena Deputy leader Raghunath Kuchik under IPC Sec 376 and 313 in Shivajinagar Police Station of Pune City Police. FIR registered after a complaint of rape and forceful abortion received last night at the Polie Station.
— ANI (@ANI) February 17, 2022
24 वर्षाच्या तरुणीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पुणे, गोवा याठिकाणी असलेल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. तरुणीनं तक्रारीत रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध ठेवले. त्यांच्यापासून तरुणी गरोदर राहिली. हे कळताच रघुनाथ कुचिक यांनी जबरदस्तीनं गर्भपात करुन तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी रघुनाथ बबनराव कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Chandrapur News : शिकाऱ्याचीच झाली शिकार; वाघ, बिबट्यांची शिकार घडवून आणणारा वनविभागाचा खबरी गजाआड
- 'साथी राहुल गांधी, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का?', भूमी अधिग्रहण कायद्यावरुन राजू शेट्टींचं पत्र
- Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी
- सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरण; बारामती न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha