एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Portfolio : शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!

Maharashtra Cabinet Portfolio : भाजपच्या 19 मंत्र्यांमध्ये सातारचे शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मिळवतानाच थेट वजनदार खाती मिळाली आहेत.

Maharashtra Cabinet Portfolio : बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तसेच अनेक रुसव्या फुगव्याच्या मालिकेनंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांना शपथविधीनंतर एका आठवड्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि उर्जा खातं आपल्याकडेच ठेवलं असून शिंदेंचा दबाव झुगारून दिला आहे. शिंदे यांनी गृहच्या बदल्यात गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास अशी खाती घेत भरपाई केली आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यानंतर शिंदे यांचा मंत्रिमंडळात दबदबा असेल. दुसरीकडे, अजितदादांनी आपलं अर्थ खाते आपल्याकडेच ठेवलं असून उत्पादन शुल्कही खेचून आणत स्वत:कडे ठेवलं आहे. 

भाजपने संकटमोचकांचे अन्  विखे पाटलांचे पंख छाटले

दरम्यान, भाजपच्या 19 मंत्र्यांमध्ये सातारचे शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मिळवतानाच थेट वजनदार खाती मिळाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आपला दबदबा आणखी भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या शिलेदारांकडे मोठी जबाबदारी दिली आहे. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास, पंचायती राज खात्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोघांनी पहिल्यांदा कॅबिनेट मिळूनही सरकारमधील वजनदार आणि महत्त्वपूर्ण खाती मिळाली आहेत.  

बावनकुळेंना लागली लाॅटरी

गिरीश महाजन यांच्याकडे भाजपचे संकटमोचक म्हणून पाहिले जाते. मात्र, त्यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी पाहता त्यांचे पंख छाटण्यात आले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही दणका बसला असून तुलनेत दोघांकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी विभागून देण्यात आली आहे. विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा ( विदर्भ, ताप, कोकण विकास महामंडळ) आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते होते. आता ते खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेले आहे. 

मूळ भाजप नेत्यांकडे तुलनेत कमी महत्वाची खाती

भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्षात  न राहणारे उच्च आणि तंत्रशिक्षण खातं कायम राखण्यात आलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांना मोठं खातं दिलं जाईल, अशी आशा फोल ठरली आहे. पंकजा मुंडे यांनाही तुलनेत कमी महत्वाचे पर्यावरण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार! 

गृह, महसूल खाते आपल्याकडे ठेवण्यात भाजपला यश आलं असलं तरी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), गृहनिर्माण, अर्थ, नगरिवकास ही खाती शिंदे आणि अजितदादांकडे गेली आहेत. मात्र, या खात्यांमधील राज्यमंत्रीपदाची जबाबदारी फडणवीस यांच्या विश्वासू शिलेदारांकडेच आहे. नगर विकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ठेवलं आहे. मात्र, याच खात्याच्या राज्यमंत्रीपदी पुणेकर भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. अर्थ खाते अजितदादांकडे असले, तरी त्या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी नागपूरकर आशिष जयस्वाल यांच्याकडे आहे. ते शिवसेनेत असले, तरी ते फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget