एक्स्प्लोर

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र यशस्वी ठरलं; अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या, पण खर्चाचे अधिकार...

Eknath Shinde Maharashtra Cabinet Portfolio: मंत्रिमंडळात भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे महत्वाचे खाती आहेत.

Eknath Shinde Maharashtra Cabinet Portfolio: राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप काल (21 डिसेंबर)ला जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन (जीएडी), ऊर्जा (नवीनीकरण ऊर्जा वगळून), विधी व न्याय आणि माहिती-जनसंपर्क ही खाती असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम-एमएसआरडीसी), तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क खाते असणार आहे. तर महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. 

एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र यशस्वी ठरल्याची चर्चा-

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे दुसऱ्या स्थानावर आहे. मंत्रिमंडळात भाजपनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे महत्वाचे खाती आहेत. नगरविकास,गृहनिर्माण,सार्वजनिक बांधकाम खाती तसेच एमएमआरडी, सिडको, एमएसआरडीएवर एकनाथ शिंदे यांचाच ताबा राहणार आहे. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधीही एकनाथ शिंदेंच्या हाती असणार आहे. अजित पवारांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्यातरी खर्चाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे राहणार आहे. एकनाथ शिंदेंनी गृह खात्यासाठी आग्रह धरला होता. मात्र एकनाथ शिंदेंनी गृहनिर्माण खातं मिळवल्याने एकनाथ शिंदेंचं दबावतंत्र यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेनेला नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपद-

शिवसेना शिंदे गटाकडून 11 आमदारांनी गेल्या आठवड्यात नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही महत्त्वाची खाती तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा मंत्रालये देण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शालेय शिक्षण यासारखी महत्त्वाची खाती अनुक्रमे प्रकाश आबिटकर आणि दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. भरत गोगावले यांच्याकडे परिवहन, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता, संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण, पर्यटन, खाणकाम, शंभूराज देसाई यांच्याकडे माजी सैनिक कल्याण आणि संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रिपदांव्यतिरिक्त, पक्षाला राज्यमंत्रीपदेही मिळाली आहेत. आशिष जैस्वाल यांच्याकडे वित्त आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार, योगेश कदम यांना गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न या खात्यांचे राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. नवीन सरकारमध्ये नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शिवसेनेला मिळाले आहे. शिवसेनेने पाच जणांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर तीन जणांना मंत्रिमंडळातुन वगळले आहे. 

एकनाथ शिंदेंकडे कोणकोणत्या खात्यांची धुरा?

नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग.

शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांकडे कुठली खाती?

कॅबिनेट मंत्री

1. उदय सांमत - उद्योग व मराठी भाषा

2. प्रताप सरनाईक - वाहतूक

3. शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

4. भरत गोगावले - रोजगार हमी, फलोत्पादन, मीठ पान जमीन विकास

5. प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

6. दादा भूसे - शालेय शिक्षण

7. गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा

8. संजय राठोड - मृदा व जलसंधारण

9. संजय शिरसाट - सामाजिक न्याय

राज्यमंत्री

10. योगश कदम -  ग्रामविकास, पंचायत राज

11. आशिष जैस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

संबंधित बातमी:

खातेवाटप जाहीर होताच धनंजय मुंडेंची पोस्ट; फडणवीस, शिंदे, अजितदादांचं नाव घेत म्हणाले, जनतेशी थेट...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूचWalmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोपNashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणी करण्याची मुदत संपली, किती जणांनी अर्ज भरले, आकडेवारी समोर
सिडकोकडून तीन वेळा मुदतवाढ , 26000 घरांसाठी किती अर्ज आले? किमती जाहीर होताच अनेकांनी निर्णय फिरवला
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात..
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
Embed widget