एक्स्प्लोर

 Sanjay Raut : शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल : संजय राऊत 

"2024 पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल आणि बरेच लोक बेरोजगार झाले असतील, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 

 Sanjay Raut : "2024 पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल आणि बरेच लोक बेरोजगार झाले असतील, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. 

भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले. त्यामध्ये त्यांनी संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, "मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्त आहे. माझा कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही. आमचा फक्त  शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे, बाकी कशावर नाही. 2024 पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल आणि त्यावेळी बरेच लोक बेरोजगार झाले असतील," असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे. 

नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या आरोपांना उत्तर दिले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले,  "कोण काय म्हणाले? हे मला माहीत नाही. परंतु, मी आता विनायक राऊत यांची पत्रकार परिषद पाहिती. त्यांनी या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेची भूमिका जोरदार पद्धतीनं मांडली आहे." 

काय म्हणाले नारायण राणे?
''स्वत: शिवसेनाप्रमुख असलेल्या अविर्भावात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत राऊतांनी वापरलेले शब्द एखाद्या वृत्तपत्रकाच्या संपादकाला शोभणारे  नव्हते. पत्रकाराला ही शोभणारी भाषा नव्हती.  राऊतांनी काल पत्रकार परिषदेत बेताल आरोप केले आहेत. प्रविण राऊत यांनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर राऊत घाबरले आहेत. भाजपवर आरोप केले. परंतु कोणेतेही पुरावे दिलेले नाहीत. 

''संजय राऊत यांना वैद्यकीय उपचाराची गरज''
दरम्यान, यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊत यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे. "बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे असे म्हणाले, संजय राऊत शिवसेनेत 1992 मध्ये आले. संजय राऊत यांचा तोल गेला असून त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. तसेच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेणं थांबवावे आणि जे ओढावलं आहे, त्याला सामोरे जावं असा सल्ला नारायण राणेंनी संजय राऊत यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

शिवसेनेकडून राणेंवर 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रहार; ईडीच्या चौकशीला घाबरून राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोप

Narayan Rane : संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर, नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

Sanjay Raut: शरद पवारांच्या पेरोलवर राहून संजय राऊत शिवसेना संपवत आहेत; चंद्रकांत पाटलांचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM  05 July 2024 TOP HeadlinesABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget