Narayan Rane : संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर, नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
प्रविण राऊत याने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर संजय राऊत घाबरले आहेत. पत्रकार परिषदेत भाजपवर आरोप केले परंतु कोणेतेही पुरावे दिलेले नाही. संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर ती बाहेर काढेन, असा इशारा नारायण राणेंनी संजय राऊत यांना दिला आहे.
मुंबई : संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. संजय राऊत शिवसेनेचे नाही तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे, असा टोला देखील नारायण राणेंना संजय राऊत यांना या वेळी दिला आहे. महाराष्ट्रच्या इतिहासातील सर्वात लाचार मुख्यमंत्री सध्याचा आहे. शरद पवार, कॉंग्रेसवर टीका केली आणि आज त्यांच्यासोबत सत्तेसाठी बसले आहे, अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
भाजपवर आरोप केले परंतु कोणेतेही पुरावे दिलेले नाही : नारायण राणे
नारायण राणे म्हणाले, स्वत: शिवसेनाप्रमुख असलेल्या अविर्भावात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत राऊतांनी वापरलेले शब्द एखाद्या वृत्तपत्रकाच्या संपादकाला शोभणारे नव्हते. पत्रकाराला ही शोभणारी भाषा नव्हती. राऊतांनी काल पत्रकार परिषदेत केलेल बेताल आरोप केले आहे. प्रविण राऊत याने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर राऊत घाबरले आहेत. भाजपवर आरोप केले परंतु कोणेतेही पुरावे दिलेले नाही.
संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे : नारायण राणे
"मी कोणाला घाबरत नाही. जो घाबरतो तो वारंवार म्हणतो मी घाबरत नाही. शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली परंतु त्या पत्रकार परिषदेला कोणीही नाही. पत्रकार परिषदेला फक्त नाशिकचे लोक होते. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: साठी घेतली हा सवालच आहे. संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर मी ती बाहेर काढेन, असा इशारा नारायण राणेंनी संजय राऊत यांना दिला आहे.
संजय राऊत यांचा तोल गेला असून त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज : नारायण राणे
बाळासाहेबांचे आशिर्वाद आहे असे म्हणारे संजय राऊत शिवसेनेत 1992 मध्ये आला. संजय राऊत यांचा तोल गेला असून त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. तसेच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेणं थांबवावे आणि जे ओढावलं आहे, त्याला सामोरे जावं असा सल्ला नारायण राणेंने संजय राऊत यांना दिला आहे.