एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : आराध्य दैवातांचे सेवेकरी मातोश्रीवर; उद्धव ठाकरे म्हणाले, नंदीबैलाला विचारा भाजप पुन्हा सत्तेत येणार का?

Uddhav Thackeray On Dasara Melava : यावर्षी सुद्धा आपला दसरा मेळावा वाजत वाजत शिवाजी पार्कवर होणार आहे, तुम्ही सुद्धा या दसरा मेळाव्याला या असं आमंत्रणही उद्धव ठाकरे यांनी सेवेकरींना दिलं. 

मुंबई: खोक्यातून तुम्ही सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाही असं सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज भाजपवर (BJP)  टीका केली. नंदीबैलाला जरी विचारलं की भाजप सत्तेत येणार आहे का तर तोदेखील नाही असंच म्हणेल असाही टोला ठाकरेंनी लगावला. महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे सेवेकऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पारंपरिक वेशात आलेल्या या सेवेकरींनी उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. 

राज्यातल्या विविध भागातून हे सेवेकरी (Maharashtra Temple Aradhya Daivat Sevekari) उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते. त्यामध्ये काही लोककलावंतही त्यांच्या पारंपरिक वेशात उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सेवेकरी आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने जर नंदी बैलाला विचारलं की पुन्हा एकदा त्यांचं सरकार येईल का? तर मला विश्वास आहे की शंभर टक्के नंदी बैल नाही म्हणेल. खोक्यातून सरकार आणू शकता पण संस्कार आणू शकत नाही. तुम्ही सगळे जण एकत्र या, संस्कृती पुढे नेण्यासाठी आपण एक मेळावा लवकरच घेऊ. 

शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava At Mumbai Shivaji Park) ही आपली परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहील. यावर्षी सुद्धा आपला दसरा मेळावा वाजत वाजत शिवाजी पार्कवर होणार आहे, तुम्ही सुद्धा या दसरा मेळाव्याला या असं आमंत्रणही उद्धव ठाकरे यांनी सेवेकरींना दिलं. 

Uddhav Thackeray On Shiv Sena Dasara Melava : लवकरच तुमचा मेळावा घेऊ 

उद्धव ठाकरे यांनी सेवेकरींशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजचं वातावरण पाहिलं तर तुमचा आशीर्वाद मला महत्त्वाचा वाटतो. अलिकडे परंपरा नष्ट होत आहेत. तुम्ही संस्कार देणारी माणसे आहेत. राज्यातील मंत्र्यांचे रुसवे फुगवे सुरू आहेत, मंत्री नाराज आहेत. पण तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणी मंत्री नाराज झालाय का? त्यामुळे सगळ्यांनी एक व्हा. दसरा मेळाव्यानंतर एक तारीख ठरवू आणि तुमचा मेळावा घेऊ. 

ही बातमी वाचा: 

Video : Matoshree : आराध्य दैवतांचे सेवेकरी मातोश्रीवर, पारंपारिक वेशात सेवेकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

">

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget