एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, धुळे-जळगावात ठाकरेंची तोफ धडाडणार

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. धुळे-जळगावमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. प्रत्येक पक्षाकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज धुळे जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. 

आज दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे मुंबईकडून जळगावकडे रवाना होणार आहेत.  दुपारी 3.45 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन होईल.  दुपारी 3.45 वाजता जळगाव येथून हेलिकॉप्टरने उद्धव ठाकरे धुळ्याकडे रवाना होतील. 4.15 वाजता धुळे येथे त्यांचे आगमन होणार आहे. 

धुळे-जळगावात ठाकरेंची तोफ धडाडणार

आज 4.30 वाजता धुळे लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यानंतर 5.15 वाजता उद्धव ठाकरे जळगावकडे रवाना होतील. सायंकाळी 6.00 वाजता जळगावचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार (Karan Pawar) यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या दोन्ही सभांमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

धुळे-जळगावात अशी होणार लढत 

दरम्यान, धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash bhamare) यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान (Abdul Rehman) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे धुळ्यात डॉ. सुभाष भामरे विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव यांच्यात लढत होणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ (Smita Wagh) आणि शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार (Karan Pawar) यांच्यात लढत होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, आणखी एका सहकाऱ्याने साथ सोडली, शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray : मोदींच्या सुरक्षेची गरज नाही, मला जनतेचं सुरक्षा कवच; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर डागली तोफ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Embed widget