एक्स्प्लोर

जमीन विकून शिवसैनिकाने उभारले बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर, नांदेडमध्ये सर्वत्र चर्चा

Balasaheb Thackeray Temple: नांदेडमध्ये एका शिवसैनिकानं वडिलोपार्जित 2 एकर जमीन विक्री करून व तब्बल 14 लाख रुपये खर्च करून बाळासाहेबांचे सुंदर व सुबक असे मंदिर उभारलंय.

Balasaheb Thackeray Temple: नांदेडमध्ये एका सामान्य शिवसैनिकांनी स्वखर्चातुन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभारले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील इटग्याळ गावात हे मंदिर उभारण्यात आलं आहे ज्याची जिल्हाभरात चर्चा होतेय. 

मुखेड तालुक्यातील इटग्याळ या छोट्याशा गावात वातव्यास असणाऱ्या व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या संजय इटग्याळकर या तरुणास बालपणापासूनच बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्व,मराठी माणूस व हिंदुत्व यासाठीचा त्यांचा लढा या विषयी नेहमीच आकर्षण राहिले आणि तो शिवसेनेकडे ओढला गेला. बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी व शिवसेना बाळासाहेबांना जवळून पाहता यावे त्यांच्या सानिध्यात राहता यावे यासाठी त्याने 2000 मध्ये थेट मुंबई गाठली. 

त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी मुंबई येथील अंधेरी स्थित जानकी देवी पब्लिक स्कूल येथे मुलांना कराटे प्रशिक्षण देण्याचे काम स्वीकारले. एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम सुरू केले.दरम्यान घरच्या परिस्थितीमुळे व कुटुंबाच्या जिम्मेदारीमुळे 2007 साली संजयने पुन्हा आपले गाव इटग्याळ गाठले. परंतु या दरम्यान त्याने बाळासाहेब व शिवसेनेचे काम मात्र चालू ठेवले.एवढेच नाही तर दरवर्षी न चुकता ते आतापर्यंत दसरा मेळाव्यास आपली हजेरी लावतात. 

या दरम्यान बाळासाहेबांच्या निधनानंतर बाळासाहेबांचे विचार त्यांचा सामन्या विषयीचा लढा, त्यांची हिंदुत्वाविषयीची जागरूकता ही तरुण पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी 2013 साली त्याने आपल्या वडिलोपार्जित जागेत बाळासाहेबांचा पुतळा उभारला. ज्या ठिकाणी 2013 पासून आतापर्यंत एक ज्योत नेहमी तेवत असते. परंतु बाळासाहेबांचा हा पुतळा उभारल्यानंतर ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपदांमुळे पुतळ्याचे नुकसान होऊ नये यासाठी त्याच जागेवर बाळासाहेबांचे मंदिर उभारण्याचे ठरवले.

संजय उदरनिर्वाहासाठी देगलूर, मुखेड, उदगीर याठिकाणच्या तरुणांना कराटे प्रशिक्षण देतात. पण कोरोना व लॉकडाऊनमुळे तेही बंद झाले आणि आर्थिक आवक बंद पडली. त्यासाठी त्यांनी वडिलोपार्जित 2 एकर जमीन विक्री करून व तब्बल 14 लाख रुपये खर्च करून बाळासाहेबांचे सुंदर व सुबक असे मंदिर उभारलंय. जवळपास एक एकर परिसरात विस्तीर्ण अशा जागेत संजय इटग्याळकर यांनी हे मंदिर उभारले असून याठिकाणी मोफत कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे. 

संजय इटग्याळकर यांनी उभारलेल्या या  बाळासाहेबांच्या पुतळ्यास 2019 साली नांदेड दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनीही भेट दिलीय. या तरुणाने त्याच्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित जमीन विकून हे मंदिर बनवलंय. स्वर्गीय ठाकरे यांच्या मंदिरासोबतच हा परिसर निसर्गरम्य करण्यासाठी या शिवसैनिकांनी मोठी मेहनत घेतलीय. स्वर्गीय बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांची आठवण जिवंत ठेवण्यासाठी आपण हे मंदिर बनवल्याचे संजयने बोलताना सांगितलंय. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी स्वखर्चातून एका सामान्य शिवसैनिकाने उभारलेल्या ह्या मंदिरा विषयी नांदेड जिल्ह्यात मात्र सर्वत्र चर्चा आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नकोAmol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसलेSanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रणPratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत; येवल्यातून शरद पवारांचा हल्लाबोल, अजित पवारही लक्ष्य
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
नाशिकमध्ये मुस्लीम बांधवांचा मोठा निर्णय! पक्षाला नव्हे तर मनसेच्या उमेदवाराला जाहीर केला पाठिंबा
Embed widget