एक्स्प्लोर

Shiv Sena MLA Disqualification :  शिंदे गटाच्या आमदारांनी ज्या प्रश्नाला बगल दिली, त्याला भरतशेठ भिडले; उलट तपासणीत तुफान फटकेबाजी

Shiv Sena MLA Disqualification :  गुवाहाटी बाबतच्या प्रश्नाला याआधी शिंदे गटाच्या आमदारांनी उलट तपासणीत थेट उत्तर दिले नाही. तिथे मात्र, भरत गोगावले यांनी स्पष्टपणे उत्तरे दिली.

Shiv Sena MLA Disqualification :  शिवसेना आमदार अपात्रताबाबत (Shiv Sena MLA Disqualification) विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांची उलट तपासणी झाली. ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांच्याकडून त्यांना प्रश्न विचारले गेले. भरत गोगावले यांनी अॅड. कामत यांच्या प्रश्नावर आपल्या स्टाईलने उत्तर दिले. गुवाहाटी बाबतच्या प्रश्नाला याआधी शिंदे गटाच्या आमदारांनी उलट तपासणीत थेट उत्तर दिले नाही. तिथे मात्र, भरत गोगावले यांनी स्पष्टपणे उत्तरे दिली. 

आज, मंगळवारच्या कामकाजात शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची उलट तपासणी झाली. ठाकरे गटाचे वकील अॅड. कामत यांनी विचारलेल्या काही प्रश्नांना थेट उत्तरे दिली तर काही प्रश्नानांना तिरकस उत्तरे दिली. त्यांच्या या उत्तराने सभागृहात हसू उमटले. त्यामुळे गंभीर असणारे वातावरण हलकं फुलकं झाले. 

'त्या' प्रश्नांना भरत गोगावले थेट भिडले 

उलट तपासणीत शिंदे गटाच्या आमदारांना गुवाहाटीला जाण्यासाठी प्रवास खर्च कोणी केला, हॉटेलचा खर्च कोणी केला, असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र, यावर थेट उत्तर देणे आमदारांनी टाळले. मात्र, भरत गोगावले यांनी गुवाहाटीच्या खर्चाबाबत थेट उत्तर दिले. अॅड. कामत यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी तुम्ही स्वतःची व्यक्तिगत तिकीट काढले होते का? की कुणी काढली होती असा प्रश्न विचारला. त्यावर भरत गोगावले यांनी आम्ही स्वतःच्या खर्चाने गेलो..कामाख्या देवीचे दर्शन स्वतःच्या पैशाने घेणे उचित आहे असे उत्तर दिले. 

'या' कारणांसाठी सूरतला गेलो

आमदार भरत गोगावले यांना सूरतबाबतही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातून जाण्यासाठी सूरत का निवडले असा प्रश्न गोगावले यांना विचारण्यात आला. त्यावर गोगावले यांनी  सूरत चांगले ठिकाण आहे, असे मी ऐकले होते. त्यामुळे तिकडे जाऊन आपण व्यक्तिश: बघावे, म्हणून मी सुरत हे ठिकाण निवडले असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने सभागृहात हास्य उमटले. काही प्रश्नानंतर गोगावले यांना  सुरतमधील एकाच हॉटेलमध्ये सर्व आमदारांनी जमणे, हा योगायोग नव्हता; तर हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. हे बरोबर आहे का?  असा प्रश्न केला. त्यावर गोगावले यांनी - ते मला माहित नाही. ते तिकडे कसे आले हे त्यांनाच माहीत असेल. शिवाजी महाराज तिकडे गेले होते, म्हणून मला वाटलं ते चांगलं ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो,असे उत्तर दिले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
'मी पठाण आहे, गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला या आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
'मला गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
Sanjay Raut : 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
Raj Thackeray on Ajit Pawar : सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Asaduddin Owaisi Speech | मुस्लीम उमेदवारावरून भाजपवर टीका, ओवैसींची संभाजीनगरमध्ये सभाABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
'मी पठाण आहे, गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला या आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
'मला गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
Sanjay Raut : 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
Raj Thackeray on Ajit Pawar : सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
सकाळचा शपथविधी झाला, काकांनी डोळे वटारले अन् अर्ध्या तासात लग्न मोडलं; राज ठाकरेंकडून अजित पवारांची मिमिक्री
Praniti Shinde: 'लाव रे तो व्हिडिओ...',  खासदार धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या, 'काय बिघडवता आमचं ते...'
'लाव रे तो व्हिडिओ...', खासदार धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्यावर प्रणिती शिंदे आक्रमक, म्हणाल्या, 'काय बिघडवता आमचं ते...'
Sambhaji Nagar Fire : छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्री अग्नितांडव, दुकानं उघडायला गेले अन् घात झाला, तिघांचा होरपळून मृत्यू
J P Gavit : एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
एक पक्ष, एक झेंडा, 10 विधानसभा, तीन वेळा लोकसभेच्या रिंगणात; निष्ठेचा लाल बावटा फडकवणारे जे. पी. गावित आहे तरी कोण?
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
Embed widget