एक्स्प्लोर

Shiv Sena MLA Disqualification Case :  ठाकरे गटाचा व्हीप, हजेरीपट बोगस; आमदार अपात्रता सुनावणीत अॅड. जेठमलानींचा दावा

Shiv Sena MLA Disqualification :  अॅड. जेठमलानी यांनी ठाकरे गटाच्या व्हीप, ठरावावर प्रश्न उपस्थित केले. अॅड. जेठमलानी यांचा उर्वरित युक्तिवाद आता बुधवारी 20 डिसेंबर रोजी होणार आहे

Shiv Sena MLA Disqualification :  शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) बजावलेला व्हीप, ठराव हे सगळंच बोगस असल्याचा दावा आज शिंदे गटाच्यावतीने (Shiv Sena Shinde Group) करण्यात आला. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत  (Shiv Sena MLA Disqualification Case ) आजपासून शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांचा युक्तिवाद सुरू झाला. अॅड. जेठमलानी यांनी ठाकरे गटाच्या व्हीप, ठरावावर प्रश्न उपस्थित केले. अॅड. जेठमलानी यांचा उर्वरित युक्तिवाद आता बुधवारी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. 

अॅड. महेश जेठमलानी यांनी संध्याकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या समोरील युक्तिवादात ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. अॅड. जेठमलानी यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की,  21 जून 2022 च्या हजेरीपटाची जी प्रत सर्वोच्च न्यायालयात दिली आहे आणि येथे सादर केली आहे, त्यात तफावत आहे.  सर्वोच्च न्यायालयात जो हजेरीपट सादर करण्यात आला. त्यावर उदय सामंत, वैभव नाईकांच्या सह्या नाहीत. तर, अध्यक्षांसमोरील सुनावणीत जो हजेरीपट सादर करण्यात आला त्यावर या दोघांच्या सह्या आहेत. 21 जून जारी करण्यात आलेला व्हीप, हजेरीपट आणि ठराव तिन्ही बोगस आहेत असा दावा जेठमलानी यांनी केला. त्यानंतर जेठमलानी यांनी 22 जून रोजी पाठवलेल्या ई-मेलचा हवाला देत म्हटले की 22 तारखेची बैठक हा केवळ अपात्रता याचिकेसाठी केलेला बनाव होता. अनेक आमदार आसाममध्ये होते याची कल्पना प्रभू यांना होती. तर काही धमकाविल्यामुळे बैठकीला जायला तयार नव्हते. 
नोटीस पाठवायची, गैरहजर राहिले म्हणून अपात्रतेची याचिका करायची यासाठीच या बैठकीचा बनाव रचला गेला असल्याचा आरोप शिंदे गटाच्यावतीने अॅड. जेठमलानी यांनी केला.  

22 जून रोजीच्या बैठकीत गटनेते अजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली अपात्रता  निलंबनाचा ठराव झाला. शिवसेनेची रचना असल्याचा मोठा दावा केला जातो. पण या अत्यंत महत्चाव्या घटना घडताना ती रचना कुठेही दिसली नाही. आताही अल्पमतात असलेल्या छोट्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका घेऊन निर्णय घेतल्या जात असल्याचा दावाही अॅड. जेठमलानी यांनी केला. अजय चौधरी यांना गटनेता करण्यासाठी असलेला 21 जून रोजीचा ठराव बोगस असल्याचे त्यांनी म्हटले. 

सुनील प्रभू यांनी उत्तरे बदलली 

सुनील प्रभू यांनी बैठकीसाठी नोटीस पाठवण्यात आली तर ती कशी आमदारांना पाठवली यावर रेकॉर्डवर उत्तर देताना तीन वेळेस उत्तरं बदलली असल्याचे अॅड. जेठमलानी यांनी सांगितले. एकदा प्रभू म्हणाले की मी मोबाइलवर नोटीस पाठवली.  नंतर सांगितलं की ई-मेल केला. त्यानंतर म्हणे मी ई-मेल नाही केला विजय जोशी यांनी ई-मेल केला. आता विजय जोशी म्हणतात की कॉम्प्युटर ऑपरेटरने ई-मेल केला. ते म्हणतात कोणी ई-मेल पाठवला त्याचे नाव आठवत नाही. कारण तीन कॉम्प्युटर ऑपरेटर होते. यामध्ये कुठलेही पुरावे नाहीत की इमेल सर्व आमदारांना गेला की नाही? या मुद्याकडेही अॅड. जेठमलानी यांनी लक्ष वेधले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaZero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Embed widget