MLA Disqualification: उदय सामंत यांची उलटतपासणी संपली, दीपक केसरकरांच्या उलटतपासणीत मोठे गौप्यस्फोट
राष्ट्रवादीत असताना तुमच्या एबी फॉर्मवर सही कोण करायचं? सामंत म्हणाले, पक्षावर विश्वास होता, सही कधी पाहिलीच नाही
Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रतेची सुनावणीला (Shiv Sena MLA Disqualification) सुरुवात झाली आहे. नागपुरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमक्ष ही सुनावणी सुरु आहे. आज शिंदे गटाच्या (Shinde Group) उदय सामंत (Uday Samant) आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलटतपासणी होणार आहे. तर परवा खासदार राहुल शेवाळेंची उलटतपासणी झाली आहे.
काय-काय घडलं आजच्या सुनावणीत?
उदय सामंत यांची साक्ष घेतली जात आहे
देवदत्त कामत : आपण शिवसेना कधी जॉईन केली
उदय सामंत : मी 2014 मध्ये शिवसेना पक्ष जॉईन केला
देवदत्त कामत : शिवसेना पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आपण कोणत्या पक्षात होता
उदय सामंत : शिसवसेनेत येण्या आधी मी राष्ट्रवादी पक्षात होतो
देवदत्त कामत : आपण किती वेळा महाराष्ट्रमध्ये आमदार राहिला आणि कोणत्या पक्षातून?
उदय सामंत : मी चार वेळा महाराष्ट्र विधान सभेचा सदस्य राहिलो आहे.दोन वेळा राष्ट्रवादी आणि दोन वेळा शिवसेनेचा
देवदत्त कामत : 2014 मध्ये आपण भाजप विरोधात आपल्या मतदारसंघात निवडणूक लढवली आहे का?
उदय सामंत : हे सत्य आहे कारण त्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढत होते. त्यामध्ये शिवसेना, भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले होतो
देवदत्त कामत : तुम्ही आपल्या शपथ पत्रातील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये शिवसेना पक्ष आणि भाजप 1999 ते 2019 पर्यत एकमेकांचे नैसर्गिक साथीदार होते.. पण ही बाब संपूर्ण पणे सत्य नाही... याबाबत आपले काय म्हणणं आहे?
उदय सामंत : ही नैसर्गिक युती होती. 2019 मध्ये देखील नैसर्गिक युतीनेच भाजप शिवसेना हे युती म्हणून लढले होते... ज्यावेळी आम्ही वेगळे लढलो त्यावेळी तसे का लढलो याची कल्पना मला देखील नाही.
उदय सामंत : मी चार वेळा महाराष्ट्र विधान सभेचा सदस्य राहिलो आहे. दोन वेळा राष्ट्रवादी आणि दोन वेळा शिवसेनेचा
देवदत्त कामत : 2014 मध्ये आपण भाजप विरोधात आपल्या मतदारसंघात निवडणूक लढवली आहे का?
उदय सामंत : हे सत्य आहे कारण त्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढत होते. त्यामध्ये शिवसेना, भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले होतो.
देवदत्त कामत : तुम्ही आपल्या शपथ पत्रातील परिच्छेद क्रमांक 2 मध्ये शिवसेना पक्ष आणि भाजप 1999 ते 2019 पर्यत एकमेकांचे नैसर्गिक साथीदार होते... पण ही बाब संपूर्णपणे सत्य नाही.. याबाबत आपले काय म्हणणे आहे
उदय सामंत : ही नैसर्गिक युती होती. 2019 मध्ये देखील नैसर्गिक युतीनेच भाजप शिवसेना हे युती म्हणून लढले होते... ज्यावेळी आम्ही वेगळे लढलो त्यावेळी तसे का लढलो याची कल्पना मला देखील नाही.
देवदत्त कामत : आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना आपला बी फॉर्म कोण सही करत असे...
उदय सामंत : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा मी अन्य ज्यावेळी निवडणुक लढलो त्यावेळी पार्टीवर विश्वास ठेवून मी ए, बी फॉर्म घ्यायचो.. त्यामुळे सही बघण्याचा कधी प्रश्न आला नाही.
कामत : पक्षावर विश्वास ठेवून एबी फाॅर्म घेत होतात, असे आपण म्हणालात. याचा अर्थ
सामंत : ज्या पक्षांमधून मी निवडणुका लढलो होतो त्यावेळी आम्ही कधीच अभ्यास केला नाही की ए.बी. फाॅर्म कोण देते?
कामत : आपल्या मते राजकीय पक्षातील कोणीही नेता ए आणि बी फॉर्म देऊ शकतो का? किंवा पक्षाचे नेतृत्व देऊ शकत का?
सामंत : याबाबत मी अभ्यास केलेला नसल्यानेमुळे मला माहिती नाही
कामत : सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे महासचिव सुभाष देसाई व सचिव अनिल देसाई यांनी ते शिवसेना राजकीय पक्षाचे निवडणूक आयोगाने केलेले प्राधिकृत प्रतिनिधी असल्याने तुमच्या ए व बी फॉर्म वर सही केली होती. हे खरे आहे का?
सामंत : मी सुरुवातीला सांगितले की मी नुसताच फॉर्म घेतला होता, त्यावर कुणाची सही होती हे मला माहिती नाही.
कामत : शिवसेनेची। नेते पदाची रचना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार आहे, ती लोकांसाठी निवडणूक आयोगानच्या। संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सामंत : शिवसेनेच्या घटनेबाबत माझा पूर्ण अभ्यास नाही. परंतु 1999 ची घटना दुरुस्ती ही वेबसाइट वर आहे. व त्यानुसार शिवसेना पक्ष चालतो, अशी माझी धारणा आहे.
कामत : शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षाच्या नेतृत्वाची जी रचना असते ती वेबसाईटमध्ये नमूद केले आहेत का?
सामंत : याबाबत मला काहीच माहिती नाही. परंतु शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, जे आज हयात नाही ते सुधीर जोशी, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे आणि अन्य आहेत हे मला बैठकीला असताना समजायचे
कामत : प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपण या बैठकीला उपस्थित राहिला असे म्हणाला या बैठका कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या
सामंत : याला काही विशिष्ट काळ नव्हता. या बैठक सभा असायच्या
कामत : (25 नोव्हेंबर 2019 ची कागदपत्रे उदय सामंत यांना दाखवण्यात येत आहेत) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीचे अध्यक्ष पद भूषविले होते. यासंदर्भात त्यांनी बैठकीत निर्णय घेतले होते.
सामंत : मी थोडे विस्तृत पणे सांगेल. ही जी बैठक आपण सांगत आहात, त्याचे ते अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. परंतु त्यांच्या बद्दल असलेला आदर आणि वंदनीय बाळासाहेब यांचे ते सुपूत्र असल्यामुळे सर्व आमदारांनी तो निर्णय घेतला होता.
सामंत : त्या बैठकीत जे निर्णय झाले त्या बैठकीचे अध्यक्ष जरी उद्धवजी असले तरी देखील आमदारांच्या एकमताने निर्णय झाले. ते केवळ जाहीर उद्धव ठाकरे यांनी केले
कामत : उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 31 ऑक्टोबर 2019 रोजी बैठक झाली. त्यात बैठकीत त्यांनी पक्ष प्रमुख म्हणून निर्णय घेतले होते, हे चूक की बरोबर?
सामंत या मताशी मी सहमत नाही. कारण त्यावेळी ज्या नियुक्त्या झाल्या होत्या, त्या आमदारांच्या ठरावाने झाल्या होत्या.
कामत : उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 रोजी पक्ष प्रमुख होते? हे खरे आहे का?
सामंत : होय
कामत : 31 ऑक्टोबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत जे निर्णय घेतले गेले ते उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वतीने घेतलेल्या बैठकीत घेतले गे चूक की बरोबर
सामंत : मी मगाशी देखील सांगितले की ते निर्णय अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतले नव्हते. आमदारांच्या ठरावाने ते निर्णय झाले होते
कामत : मला असे म्हणायचे आहे की, शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सदस्य यांनी 31 ऑक्टोबर 2019 च्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेते नियुक्ती केली.. त्यांचे पक्षाचे नेते म्हणून निवड झाली नव्हती हे चूक की बरोबर
सामंत : मी याचे उत्तर मगाशीच दिले आहे, की आमदारांच्या ठरवाने आणि एकमताने एकनाथ शिंदे हे गटनेते आहेत हे ठरवण्यात आले होते.
कामत : हे खरे आहे का की उद्धव ठाकरे हे त्यानंतर आमदार अपात्रता सुनावणी याचिका दाखल करेपर्यंत म्हणजेच जुन-जुलै 2022 पर्यंत पक्षप्रमुख/अध्यक्ष होते.
सामंत : मला असे वाटते की ज्या जून आणि जुलैमधील तारखा आहेत त्याच्या काही कालावधी आगोदर पक्षात काही विशिष्ट गोष्टींबाबत मतभेद झालेले होते, ती देखील पार्श्वभूमी नाकारता येणार नाही.
कामत : जून 2022 ला एकनाथ शिंदे यांनी सुरत आणि गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला त्याला तुम्ही पाठिंबा दिला होता का?
सामंत : पाठींबा नक्की दिला होता आणि तारीख रेकॉर्डवर आहे
कामत : तुम्ही गुवाहाटीला कधी गेला होता
सामंत : मला निश्चित तारीख आठवत नाही पण 24 किंवा 25 जूनला गेलो असेन.
कामत : विधीमंडळ पक्षाचे कार्य कसे चालावे,याबाबत पक्षाच्या घटनेत कुठलाही उल्लेख नाही, तसे आपण का म्हणत आहात?
सामंत : मी मघाशी उल्लेख केला की 1999 मध्ये घटना दुरुस्ती झाली, त्याचा मला पूर्ण अभ्यास नाही. पण त्यात जे काही थोडे मी वाचले, त्यातून मी असे म्हटले आहे.
कामत : तुम्ही 2019 ते जुन 2022 पर्यंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पद भुषविण्याइतपत नाराज होता का?
सामंत : ज्यावेळी मी मंत्री पदाची शपथ घेतली त्यापूर्वी देखील गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो. भविष्यात तशीच कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधी नंतर तुमची मागणी मान्य केली जाईल. भाजपसोबत सरकार स्थापन केले जाईल, असे आश्वासन दिले गेले. म्हणून मी मंत्री मंडळात सामील झालो.
उदय सामंत यांचा गौप्यस्फोट
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना गटनेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापनेचं आश्वासन दिले होते. भविष्यात तशीच कार्यवाही करण्याचे मान्य केले होते.
कामत : तुम्ही प्रतिज्ञापत्रात दिल्याप्रमाणे तुम्ही निवडणूक नंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या महा विकास आघाडीमुळे नाराज होता, हे खरे की खोटे?
सामंत : होय, मी नाराज होतो.
कामत : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करावी म्हणून भेटलो असे नमूद केले. तुम्ही एकनाथ शिंदे यांना तशी विनंती का केली नाही?
सामंत : मी आणि माझ्या आमदार सहकाऱ्यांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. आमच्या मागणीनुसार गटनेते एकनाथ शिंदे देखील अनेकवेळा उद्धव ठाकरे यांना भेट घेऊन हे सांगितले होते. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.
कामत : एकनाथ शिंदे यांना शिवसेना भाजप सोबत युती करण्याबाबत बोलला होता कारण ते गटनेते होते हे चूक की बरोबर
सामंत : बरोबर
सामंत यांना त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद 18 मधील शेवटची ओळ दाखविण्यात आली. पक्ष संघटनेतील बहतांशांनी ज्यात लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी एकमताने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.
कामत : तुम्ही फक्त निवडून आलेल्यांबद्दल बोलत आहात का?
सामंत : निवडून आलेले लोकप्रतिनीधी यात आमदार, खासदार, विधान परिषदेवे सदस्य आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी असतात.
कामत : आपण 21 जून 2022 रोजी वर्षावर बैठकीला उपस्थित होता..कारण तुम्हाला सुनील प्रभू यांचे पत्र प्राप्त झाले होते
सामंत : 21 जून रोजी माझे विधिमंडळातील सदस्य गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर बैठक असल्याचे मला सांगितले आणि निमंत्रण दिले. परंतु ती बैठक कशासंदर्भातील आहे हे सांगितले नव्हते. मी या बैठकीला उपस्थित होतो. परंतु त्या दिवशी किंवा त्यानंतर कोणताही व्हीप मला देण्यात आलेला नाही. मी तो स्वीकारलेला नाही आणि कोणतीही सही कोणत्याही कागदावर केलेली नाही.
कामत : 21 जून 2022 मधील हा पक्षादेश प्राप्त झाला हे सांगितले होते हे चूक की बरोबर
सामंत : मी आधीच सांगितले आहे की, ही सही माझी नाही. हा व्हीप मी स्वीकारलेला नव्हता.परंतु माझ्या मर्यादित माहीतीनुसार व्हीप हा सभागृहातील कामकाजासाठी किव्हा मतदानासाठी असतो. आता माझ्या हातात जो कागद ठेवलेला आहे त्यावरून मला असे वाटते की, हा व्हीप नसून ते पत्र आहे. त्यावर असलेली सही माझी नाही. त्यामुळे तो स्वीकारायचा प्रश्नच नाही. असा कागद निमंत्रण किंवा पत्र खाजगी कार्यक्रमाचे देखील निघू शकते.
कामत : कागदपत्रावर जे नाव लिहिले आहे ते हस्ताक्षर आपले आहे का?
सामंत : नाही
कामत : हा कागद म्हणजे, आपल्याला 2022 रोजी व्हीप क्रमांक 2 स्विकारल्याची पोहोच आहे. कुठल्याही खाजगी कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. हे खरे आहे का?
कामत : मी कोणत्याही कागदावर सही केलेली नाही, मी व्हीप स्वीकारलेला नाही आणि त्या कागदावरील सही माझी नाही.
कामत : या कागद पत्रावर जे हस्ताक्षर आणि सही आहे ती आपली आहे.
सामंत : या कागद पत्रावर जे हस्ताक्षर आणि सही आहे ती माझी नाही.
कामत : 21 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीचे हजेरी पत्रक पाहा. तुम्ही वर्षा बंगला येथे 21 जून 2022 रोजी या हजेरी पत्रकावर अनुक्रमांक 50 समोर सही केली आहे. हे खरे आहे का?
सामंत : हे चूक आहे.
पहिल्या सत्रातीस सुनावणी थांबली
विधानसभा कामकाज पाहून दुपारी सुनावणी होणार
दुपारी 2.30 नंतर सुनावणी घेण्याचे प्राथमिक मत
कामत : कागदावर 24 सह्या आहेत का?
सामंत: मला जो कागद हातात दिला आहे त्यावरील सह्या मोजल्या असता त्या 24 आहेत. परंतु माझी त्यावर सही नाही
कामत : सामंत यांना अपात्रता याचिका दाखवा. या 19 क्रमांकाच्या याचिकेत तुम्ही दिलेल्या उत्तरात शिवसेना विधीमंडळ पक्षाची एक अनधिकृत बैठक आयोजित केली होती. त्यात 55 पैकी कथित 24 आमदारांनी त्यास हजेरी लावली होती, असं आपण म्हटलं. जर तुम्ही त्या बैठकीच्या हजेरी पत्रकावर सही केली नाही, तर तुम्ही असा उल्लेख का केला आहे?
सामंत : मी त्यामध्ये कथित हा उल्लेख केला आहे. जी काही कागदपत्रे मला आता दाखविण्यात आली त्यावरील सहा देखील मी केलेली नाही.
कामत : हे उत्तर तुम्ही देत आहात म्हणजे याआधी तुम्हाला दाखवलेले पत्र याआधी कधी पाहिले नव्हते?
सामंत : मी मागील उत्तरात म्हटले आहे की माझ्या हातामध्ये जे सह्यांचे कागद देण्यात आले त्यावरील सही माझी नाही.
कामत : थोड्या वेळा पूर्वी तुम्हाला दाखवलेला हा कागद आजच्यादिवसा पूर्वी तुम्ही कधी पाहिला आहे का?
सामंत : आजच्या दिवसापूर्वी नाही पाहिला
कामत : याचा अर्थ अपात्रता याचिका तुम्ही ऑगस्ट 2023रोजी दाखल करताना आणि 24 नोव्हेंबर 2013 रोजी तुमचे प्रतिज्ञापत्र सादर करताना तुम्हाला या कागदपत्राबाबत कल्पना नव्हती?
सामंत : हे कागदपत्रे आता पाहत असलो तरी माझ्या वकिलांनी उत्तर देताना मला माहिती दिली होती. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21 तारखेच्या बैठकीनंतर ज्यावेळी मी माझ्या शासकीय निवासस्थानी आलो; त्यावेळी देखील मी सोशल मीडिया आणि टीव्हीवर असे पाहिले की, मी कोणत्याही कागदपत्रावर किंवा व्हीपवर सही न करता देखील त्यावेळी माझ्या नावाचा उपयोग करून एकनाथ शिंदे यांना हटविण्याची कार्यवाही करण्यात आली होती.
कामत : तुमचे उत्तर दाखल करताना, तुमच्या वकिलांनी आपल्याला या कागदपत्राबाबत कल्पना दिली होती. मग तुम्ही या कागदपत्रावर सही केली नाही, असा इन्कार तुम्ही तुमच्या प्रतिज्ञापत्रात का केला नाही?
(ठाकरे गट व शिंदे गटाच्या वकिलांमध्ये पुन्हा जुंपली
चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारत असल्याचा आक्षेप
देवदत्त कामत यांचा शिंदे गटाच्या वकिलांना टोला
"प्रतिज्ञापत्रात खराब उत्तर दिल्यामुळे असे प्रश्न विचारत आहे - कामत"
"होपलेस पिटिशनला अशीच उत्तर द्यावी लागतात - हर्षल भडभडे"
शिंदे गटाचे वकिल हर्षल भडभडे यांकडून कडवे प्रत्युत्तर
उदय सामंत : याचे उत्तर मी आधीच दिले आहे, कारण सहीच्या बाबतीतील कागदपत्रांवर मी सही केलेली नाही या बाबीवर मी ठाम आहे.
कामत : तुमची या हजेरी पत्रकावर सही नाही, याचा इन्कार तुम्ही दाखल केलेल्या याचिकेत उत्तर देताना केला नाही, कारण ही तुमचीच सही आहे. हे बरोबर आहे का?
सामंत : याच्याशी मी सहमत नाही. ती सही माझी नाही.
कामत : 21 जून 2022 रोजी जी बैठक झाली, त्यावेळच्या हजेरी पत्रकावर तुमची सही नाही, असे तुम्ही म्हणत आहात. हे तुम्हाला नंतर सुचलं असून तुम्ही खोटं बोलत आहात. हे योग्य आहे का?
सामंत : हे चुकीचे आहे.
कामत : 22 जून 2022 रोजी आयोजित बैठकीत तुम्ही उशीरा पोहचला, आणि आपल्या कर्मचाऱ्याने त्याचा फोटो कॉपी घेतल्यानंतर तुम्ही त्यावर सही केली. हे खरे आहे का?
सामंत : हे चुकीचे आहे. 22 जून 2022च्या बैठकीत मी उपस्थितच नव्हतो.
कामत : mlaoffice99@gmail.com हा ईमेल आयडी आपला आहे का?
सामंत : होय
कामत : 2 जुलै 2022 रोजी तुम्हाला तुम्ही दिलेल्या ईमेल आयडी वर विजय जोशी यांच्या ईमेल आयडी वरून सुनील प्रभू यांनी जारी केलेले 2 व्हीप मिळाले होते. हे खरे आहे का?
सामंत : हे चुकीचे आहे. माझ्या मेल आयडी वर मला कुठलाही व्हीप मिळालेला नाही.
कामत : राजन साळवी हे शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत निवडणूक आलेले आहेत, हे तुम्हांला माहीत आहे का?
सामंत : होय
कामत : तुम्ही भाजपचे राहुल नार्वेकर यांना 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत मतदान केले होते का?
सामंत : अध्यक्ष पदाची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीत मी माझ्या सदसदविकेबुद्धी प्रमाणे राहुल नार्वेकर यांना मतदान केले होते. कारण महाराष्ट्र विधानसभेचे कामकाज ते योग्य तऱ्हेने चालवतील, अशी खात्री होती.
(कोण 'नाही' सांगणार... राहुल नार्वेकर यांची कोपरखळी, सभागृहात सुनावणी दरम्यान एकच हास्य)
कामत : विधानसभा अध्यक्ष पदासाठी 3 जुलै 2022 रोजी झालेल्या निवडणुकीत शिवसेना या राजकीय पक्षाने व्हीप जारी केला होता, असे आपल्याला म्हणायचे आहे का?
सामंत : मी मागील उत्तरात देखील सांगितले आहे की मला जी माहिती आहे त्यानुसार अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत व्हीप ची आवश्यकता नाही. म्हणून मी सदविवेकबुद्धी जागृत ठेवून योग्य त्या व्यक्तीला मतदान केले. त्यावेळी ही मला व्हीप मिळालेला नव्हता.
कामत : पक्षातील लोक प्रतिनिधी आणि पदाधिकारी हे खूप वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडत होते, असे आपण म्हणता आहात. मग किती वर्षांपासून ही गाऱ्हाणे मांडली जात होती?
सामंत : काळ मोठा होता, पण स्पेसिफिक मला आता आठवत नाही.
कामत : तुम्हाला सुमारे सांगता येईल का?
सामंत :मला आठवत नाही.
कामत : तुम्ही याआधीच्या उत्तरात एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेना नेते म्हणून केला. ते एकटेच शिवसेना नेते होते की अनेक नेत्यांपैकी एक होते?
सामंत : सुरुवातीला मी उत्तरात सांगितले, की शिवसेना नेत्यांची। जेवढी नावे मला आठवतात, तेवढी नावे मी सांगितली. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे देखील नाव होते. मी सन 2004 मध्ये विधानसभा सदस्य झालो, त्यावेळी पासून देखील ते शिवसेना नेते आहेत.
कामत : तुम्ही प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे की, "पक्षाच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं" हे चूक आणि तथ्यहीन आहे.
सामंत : हे चुकीचं आहे. मी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितली पाहिजे. 1999 च्या अमेंडमेंटमध्ये पक्ष प्रमुख हे पद नसताना देखील पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आम्हाला सर्वांना आदर होता. म्हणून पक्ष प्रमुख असा उल्लेख आमच्याकडून होत होता. तरी देखील आमदारांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क नसल्याने लोकप्रतिनिधी तसंच पदाधिकारी आपल्या सर्व अडीअडचणी गेली कित्येक वर्षे शिवसेनेचे नेते म्हणून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडायचे. आणि शिवसेना नेते म्हणून एकनाथ शिंदे सर्वांना न्याय द्यायचे.
कामत : एकनाथ शिंदे हे केव्हा आणि कसे नेते बनले याची आपल्याला कल्पना नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का?
सामंत : कल्पना नाही.
उदय सामंत यांचं उलट तपासणीदरम्यान मोठं वक्तव्य
बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून आणि आदर होता म्हणून उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हटलं जात होतं
1999 च्या पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुख पद नसतानाही आम्ही उद्धव ठाकरे यांना पक्ष प्रमुख म्हणायचो.
कामत - तुम्ही म्हटला की पक्षाचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी मांडत होते. हा कुठला काळ होता?
सामंत - तसं बरंच वर्षांपासून पण आता आठवत नाही.
कामत - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे असं तुम्ही म्हणत आहात तेव्हा ते शिवसेनेचे एकमेव नेते आहेत की अनेकांपैकी एक आहेत?
सामंत - सुरुवातीच्या उत्तरात शिवसेना नेत्यांची नावं सांगितली होती. त्यात एकनाथ शिंदे यांचंही नाव होतं. 2004 रोजी मी जेव्हा विधानसभेचा सदस्य झालो. त्यावेळी पासून ते शिवसेनेत आहे.
कामत - शिवसेना पक्षात नेते पदाच्या निवडीसाठी काही प्रक्रिया आहे का?
सामंत - मला हे माहिती नाही.
कामत - मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही रेकाॅर्डवरती कोणतंही डाॅक्युमेंट सबमीट केलेलं नाही ते जे सांगू शकेल की 2018 च्या आधी एकनाथ शिंदे हे शिवसेना राजकीय पक्षाचे नेते होते. हे बरोबर आहे का?
सामंत - हे चूक आहे.
कामत - 23 जानेवारी 2018 रोजी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नेते केलं. हे बरोबर आहे का?
सामंत - मला आठवत नाही.
कामत - क्रमांक 56 चे उत्तर देताना तुम्ही म्हटलंय की "we address Uddhav Thackeray as Paksha pramukh.". 'पक्ष प्रमुख' हा शब्द कुठून घेतला?
सामंत - काही नेते मंडळींची इच्छा होती आणि आदरापोटी सर्वांनी ते उचलून धरले.
कामत
उद्धव ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाच्या अध्यक्ष 2013 ला एक मताने पहिल्यांदा निवडून आले होते ला
सामंत
मला याबद्दल कल्पना नाही
कामत
एकनाथ शिंदे हे 2004 पासून नेते होते हे कसं काय म्हणाला
सामंत
विधान सभेचा सदस्य झाल्यानंतर विधान सभेतील सहकार्यासोबत चर्चा करताना मला ही माहिती मिळाली
कामत
68 च्या उत्तरात आपण म्हणालात की ही माहिती आपल्याला एका सहकार्याकडून मिळाली हे चूक की बरोबर
सामंत
होय, असू शकेल कारण त्यावेळी मी एनसीपीमध्ये होतो
कामत
आपण जी विधान केलीत ती खोटी आहेत कायदेशीर रित्या चुकीची आहेत
उदय सामंत यांची उलट तपासणी संपली
72 प्रश्नाच्या उत्तरा नंतर उलट तपासणी संपली
शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांची उलट तपासणी सुरू
अनिल साखरे - ( शिंदे गटाचे वकील) : तुम्हाला 4 जुलैला व्हीप कधी आणि कुठे मिळाला
केसरकर : 4 जुलै 2022 ला सकाळी मला प्रेसिडेंट हॉटेलला व्हीप मिळाला. नंतर मी गोगावले यांच्या सोबत विधिमंडळ येथे गेलो.. जे आमदार मला भेटले नव्हते त्यांचे व्हीप मी टपाल पेटित ( पीजन होल) टाकले. त्यांनी मूळ व्हीप मला दाखवला होता. मूळ व्हीप मला भरत मारुती शेठ गोगावले यांनी दाखवला.
कामत - 4 जुलै 2022 रोजी तुम्हाला किती वाजता व्हीप देण्यात आला
केसरकर - मला सकाळी देण्यात वेळ आठवत नाही
कामत - हॉटेल प्रेसिडेंटमध्ये तुमच्या सोबत किती आमदार होते
केसरकर - मला आठवत नाही
कामत - भरत गोगावले यांच्या हातात व्हीपच्या किती प्रति होत्या
केसरकर - मी मोजल्या नाही त्यामुळे मला माहित नाही
कामत - त्यांचा हातात एक व्हीप होता की अनेक प्रति होत्या
केसरकर - मी त्यांना टपाल पेटित व्हीप टाकताना पाहिले पण त्याच्या प्रति मोजल्या नाहीत
कामत - भरत गोगावले यांनी तुम्हाला व्हीपचा मूळ प्रत हॉटेलमध्ये दाखवली की विधान सभेत
केसरकर - हॉटेलमध्ये
कामत - तुम्हाला विधान सभेत व्हीपचा मूळ प्रत दाखवली नाही का?
केसरकर - त्यांच्या हातात मूळ व्हीप होता. मी त्यांच्या सोबत असल्यापासून तो त्यांच्या हातातच होता
कामत - त्यांच्या हातात असलेल्या व्हीपची मूळ प्रत होती की नक्कल प्रत होती. हे तुम्ही पाहिलं किंवा तपासल का?
केसरकर - मी त्यांना विचारलं की ते हे टपाल पेटित का टाकत आहात. तर त्यांनी उत्तर दिले.. जे आमदार मला भेटत नाही आहेत त्यांच्यासाठी हे पेटीत टाकत आहे. जे भेटतील त्यांच्या हातात ही प्रत दिली जाईल.
कामत - टपाल पेटीत टाकलेला व्हीपची मूळ प्रत होती की नक्कल प्रत होती हे तुम्ही तपासले नाही
केसरकर - मी त्यांना टपाल पेटीत टाकताना पाहिले ती प्रत मी तपासली नाही
कामत - ती व्हीपची मूळ प्रत होती की नक्कल प्रत होती याची वैयक्तिक माहिती तुम्हाला नाही हे खरं आहे का?
केसरकर - या प्रश्नाचे उत्तर मी नुकतेच दिले आहे.
कामत - किती आमदाराच्या टपाल पेटीत या कथित व्हीपच्या प्रति टाकण्यात आल्या
केसरकर - मी त्या मोजल्या नाहीत
कामत - तुम्ही जी माहिती देत आहात ती चुकीची आहे
केसरकर - हे खर नाही
कामत - तुम्ही शिवसेनेत कधी प्रवेश केला
केसरकर - 2014
कामत - शिवसेनेत येण्या आधी तुम्ही शिवसेना विरोधात निवडणूक लढला का? आणि त्याची माहिती द्याल का?
केसरकर - होय.. मी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून शिवसेना उमेदवार शिवराम दळवी यांच्या विरोधात 2009 ची विधानसभा लढलो.
कामत - बाळासाहेब हयात असताना त्यांच्या तत्वांशी तुमची निष्ठा नव्हती असा याचा अर्थ होतो का? आणि तुम्ही बाळासाहेबांनी दिलेल्या उमेदवारा विरोधात लढलात हे खरं आहे का?
केसरकर - हे खरं नाही..मी नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचा आदर केला आहे. आणि माझ्या जाहीर भाषनातही त्याचा उघडपणे उल्लेख केला आहे
कामत - तुमच्या प्रतिज्ञा पत्रात बहुमताने निवडलेला नेता या वाक्याचा अर्थ काय आहे
केसरकर - याचा अर्थ असा आहे की, पक्षाचे नेते म्हणून आम्हाला सांगण्यात आले होते, पक्षांमधते नेता म्हणून ज्याला संबोधले जात होते त्याचे मी नेहमीच ऐकत होतो. मी ते गृहीत धरले होते की ज्यांना नेता संबोधले जाते त्यांचे मी नेहमी ऐकत होतो.
कामत
शिवसेना पक्ष संघटनेत तुम्ही प्रतिनिधी सभा ऐकलं होतं का
केसरकर - हो मी प्रतिनिधी सभे बद्दल ऐकलं पण त्या निवडणुका झाल्या नाहीत
कामत - तुम्हाला प्रतिनिधी सभांच्या निवडणुका बद्दल कसे माहिती
केसरकर - निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर असलेल्याशिवसेनेच्या घटनेतून ही माहिती मिळाली
कामत - ही घटना असलेली निवडनुक आयोगाचे संकेत स्थळ तुम्ही पाहिले आहे का?
केसरकर - मी माझ्या सहाययक कर्मचाऱ्याला या घटनेची प्रत काढायला सांगितले होते आणि ती प्रत मी वाचली
कामत - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर राजकीय पक्षांच्या संघटनात्मक निवडणुकांची वेळोवेळी प्रकाशित केली जाते याची तुम्हाला माहिती आहे का?
केसरकर - मला माहिती नाही
कामत - शिवसेनेच्या 2013 ते 2018 आणि 2018 ते 23 या काळातील संघटनात्मक निवडणुकांची माहिती वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळांवर अपलोड केलेली आहे हे खरं आहे का?
केसरकर - मला याबाबत माहिती नाही.
कामत - (केसरकर यांना 27 फेब्रुवारी 2018 चे एक पत्र दाखवण्यात आले)
कामत - तुम्ही पहिले कागदपत्रे केव्हा पाहिली
केसरकर - हे पत्र मला माझ्या वकिलाने दाखवले. याची प्रत त्याना विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून मिळाली असे त्यांनी मला सांगितले
कामत - हे कधी मिळाले याचे उत्तर द्याल का?
केसरकर -मला खरंच सांगता येणार नाही. मला वकिलांनी असे सांगितले की याचिककर्त्यानी अध्यक्ष कार्यालयात ही प्रत दाखल केली होती
कामत - तुम्ही तुमच्या उत्तराचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्या आधी की दाखल केल्यानंतर ही प्रत तुम्हाला मिळाली
केसरकर - मी माझं उत्तर दाखल करण्यापूर्वी
कामत - (केसरकर यांना एक कागदपत्रे दाखवत आहेत)
कामत - तुम्ही या कागडपत्राशी सहमत आहात का?
केसरकर - मी या कागदातील मजुकराशी सहमत नाही. कारण की 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असतो त्यामुळे आम्ही त्या दिवशी तिथे होतो मात्र कुठलीही निवडणूक झाली नाही.
कामत - तुम्ही तुमच्या याचिकेत हे फेटाळले का नाहीत
केसरकर - रेकॉर्डवर आहेत. मी कशाला फेटाळू
कामत - रेकॉर्डवर काय आहे
केसरकर - हे पत्र रेकॉर्डवर आहे
कामत - शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुका 23 जानेवारी 2018 रोजी झाल्या आणि त्याच्या निकालाची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली हे खरं आहे का?
केसरकर - मला माहिती नाही
कामत - तुम्ही 2018 च्या संघटनात्मक निवडणुकांच्या निकालाला कधी आव्हान दिले आहे का?
केसरकर - मला याबद्दल माहिती नाही. मी आव्हान दिलेलं नाही
कामत - तुम्हाला याबाबत माहिती मिळाल्या नंतर तुम्ही आव्हान का दिले नाही
केसरकर - हे रेकॉर्डवर आहे
कामत - कुठल्याही कोर्टात किव्हा आयोगात 2018 च्या निवडणुक निकालाला कुठल्याही पक्षकार किंवा व्यक्तीने आव्हान दिलेलं नाही हे खर आहे का?
केसरकर - मला याबद्दल माहिती नाही.
कामत - तुम्ही किंवा तुम्ही ज्यांना नेते म्हणता त्यांनी याआधी कधीही हिंदुत्व विचारधारेवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली नाही. हे खरे आहे का?
केसरकर - हे खरे नाही. मी वारंवार उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप सोबत जाण्याचा विनंती केली होती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीशी भाजपची विचार करणे मिळतीजुळती आहे. मी पंतप्रधानांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची बैठक घेण्यासाठी मध्यस्थी केली होती. 8 जून 2021 रोजी ज्यावेळी मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर होते, या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर फक्त उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती. या बैठकीत काय झाले? याची माहिती मला उद्धव ठाकरे यांच्या कडून मिळाली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे ठरवले होते, अशी माहिती मला मिळाली. मुंबईत पोहचल्यानंतर 15 दिवसांच्या आत महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून युतीची पुर्नस्थापना करण्याचा शब्द नरेंद्र मोदींना दिला होता. परंतु मला माझ्या सहकाऱ्यांची समजूत घालण्यासाठी अधिकचा वेळ लागेल, असा निरोप मी मोदीजी यांना द्यावा, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले होते. हा निरोप मी दिल्लीला पोहचवण्यासाठी व्यवस्था केली. दोन्ही पक्षांनी एकत्र यावे ही पक्षातील बहुतेक लोकांची इच्छा होती. त्यामुळे सदर बाबीस वेळ होत असल्याने मी माझ्या पक्षातील काही ज्येष्ठ लोकांना याची माहिती दिली. त्यामध्ये सुभाष देसाई, अम्ल देसाई, एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. व त्यांना याबाबतचा निर्णय लवकर होण्याबाबत उद्धवजींना विनंती करावी, अशी विनंती केली.