शिवसेनेला ठाकरेंपासून कोणीच वेगंळ करू शकत नाही; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विरोधकांमध्ये संताप
Shiv Sena : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयागाच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबान चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. निवडणूक आयोगाने आज याबाबतचा निर्णय दिलाय. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर विरोधकांवडून जोरदार टीका होत आहे. "निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. "चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते. ही पटकथा आधीच लिहून तयार होती. देश हुकूशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच. खोके चमत्कार झाला! लढत राहू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
EC Decision on Shiv Sena Symbol : शिवसेनेला ठाकरेंकडून कोणीच वेगळं करू शकत नाही : बाळासाहेब थोरात
निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. शिवसेनेला ठाकरेंपासून कोणीच वेगंळ करू शकत नाही. शिवसेना आणि ठाकरे हे वेगळं समीकरण आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला असला तरी जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देईल. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्यांनी योग्य निर्णय दिला पाहिजे होता. परंतु, त्यांनी एकतर्फी निर्णय दिलाय. भाजपची ही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, जनता याचं निक्कीच उत्तर देईल, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
Shiv Sena Symbol : ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं : अजित पवार
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. "शिवसेना पक्षाच्या बाबत म्हणणं ऐकून घेणार म्हणत होते. तरी देखील आज अनपेक्षित निर्णय दिला. हा कसला न्याय? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी संघटना स्थापन केली. महाराष्ट्रभर पक्ष वाढवला, सभा घेऊन पक्ष सगळीकडे वाढवला. बाळासाहेब यांची भूमिका स्पष्ट होती. त्यावेळी बाळासाहेब यांनी सांगितलं होतं की मुंबई मराठी माणसाची आहे, त्यांनी बंद म्हटलं की मुंबई बंद व्हायची. पानपट्टीवर असलेला माणूस आमदार केला, वडाप चालवणारा माणूस आमदार केला. शरद पवार साहेब आणि बाळासाहेब यांची मैत्री घट्ट होती. बाळासाहेब यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे पक्ष सांभाळतील, आदित्य ठाकरे काम करतील. पण आता ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
"सुप्रिम कोर्टात 21 तारखेपासून नियमीत सुनावणी होणार आहे. परंतु, न्यायालयाच्या आधीच निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची एवढी घाई का केली हे लक्षात येत नाही. निवडणूक आयोगाने आज निर्णय दिला असला तरी जनता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. आजचा निकाल हा अनपेक्षित आहे. आगामी काळात महाराष्ट्रातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्याच बाजून कौल देईल, असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
EC Decision on Shiv Sena Symbol | निवडणूक आयोग कोणाचं एकतं हे लक्षात येतं : रोहित पवार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. "21 फेब्रुवारीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा आमदारांच्या निलंबनाचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागेल. राहिला प्रश्न निवडणूक आयोगाचा, जेंव्हा गुजरात आणि हरियाणा यांच्या निवडणूका एकत्रित होत्या तेंव्हा पंतप्रधान मोदी साहेबांना दोन्हीकडे एकाचवेळी प्रचार करता येणार नव्हता. तेंव्हा आयोगाने दोन्ही निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या, यावरूनच आयोग कोणाचं ऐकतं हे लक्षात येतं. आत्ताच्या विधानसभा पोटनिवडणुकीवर कोणता ही फरक पडणार नाही. कारण 21 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचे निलंबन केलं तर परिस्थिती काय राहील याचा विचार करा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या