एक्स्प्लोर
शिर्डीत लवकरच बायोमेट्रिक पद्धतीनं दर्शन, संस्थानाचा महत्वाचा निर्णय

शिर्डी: शिर्डीच्या साईबाबांचं दर्शनाबाबत शिर्डी संस्थानानं फार महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे भाविकांना हायटेक पद्धतीनं दर्शन करता येणार आहे. लवकरच शिर्डीमध्ये बायोमेट्रिक पद्धतीनं दर्शन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली. भाविकांना साईबाबांच्या दर्शनासाठी आधी नोंदणी करावी लागणार आहे. दिलेल्या वेळेनुसार भाविकांना अवघ्या काही वेळेत दर्शन करता येणार आहे. त्यामुळे यापुढे भाविकांना तासनतास रांगा लावाव्या लागणार नाही. पुढील दोनच महिन्यात शिर्डीतमध्ये हायटेक पद्धतीनं दर्शन सुरू करण्यात येणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी अनेकदा मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या निर्णयामुळे भाविकांना फार कमी वेळात दर्शन करता येईल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























