एक्स्प्लोर
शरद पवार आज दुपारी ईडीच्या कार्यालयात जाणार, परिसरात जमावबंदी लागू
ईडी कार्यालयाबाहेर कुठल्याही प्रकारची गर्दी करु नका, असं आवाहन पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. ईडी कार्यालयाबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसंच तिथं शांतता राखली जावी याची काळजी घ्या, असं आवाहन पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
मुंबई : शिखऱ बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार आज दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने या परिसरात जमावबंदीचे आदेश जारी केला आहे. जमावबंदीच्या आदेशानुसार या परिसरात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ईडीने कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नसतानाही पवार ईडी कार्यालयात जाणार आहेत. त्यामुळे ईडीचे अधिकारी मात्र पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कळतंय. जेव्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल तेव्हाच यावं असा संदेश पवारांना ईडीकडून मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या दरम्यान राज्यभर दौरे करणार असल्यानं त्यावेळी आपल्याला ईडीच्या पुढे हजर राहणं शक्य नसल्याचं पवारांनी यापूर्वीच सांगितलं आहे.
Sharad Pawar | ईडी कार्यालयात येऊ नका, शरद पवारांचं आवाहन; मात्र कार्यकर्ते म्हणतात 'आमचं ठरलंय'!
दरम्यान ईडी कार्यालयाबाहेर कुठल्याही प्रकारची गर्दी करु नका, असं आवाहन पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. ईडी कार्यालयाबाहेर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसंच तिथं शांतता राखली जावी याची काळजी घ्या, असं आवाहन पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मात्र आम्ही मुंबईला येणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या जात आहेत. शरद पवार हे सर्व कार्यकर्त्यांचे विठ्ठल आहेत. त्यांच्यासोबत आपण स्वत: जाणार असून सर्व कार्यकर्त्यांनीही हजर राहण्याचं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. शरद पवारांच्या ट्वीटला उत्तर देताना आव्हाड यांनी माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार. तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय. वय वर्ष 79. हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय. उद्या साठी माफ करा. ह्या सगळ्या आपण एकटाच लढलात. सगळ्या संकटांवर मात केलीत . ह्या लढाईत मात्र तुम्हाला साथ द्यायला महाराष्ट्र तयार आहे. म्हणून साहेब 35 वर्ष तुम्ही जे सांगितलं ते ऐकलं. पण ह्यावेळेस माफ करा, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे.@MumbaiPolice @NCPspeaks
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 26, 2019
माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार... तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत कर्क रोग मांडी च्या हाडाचे ऑपरेशन पायाला झालेली इजा तरी तुम्ही लढताय वय वर्ष 79 हे सगळे तुम्ही आमच्या साठी सोसलय उद्या साठी माफ करा @PawarSpeaks pic.twitter.com/EvBxyZ3zjR
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 26, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement