Sharad Pawar : पुण्यातल्या विशिष्ट भागात भाजपला जास्त मतदान होतं, आम्ही त्याला व्होट जिहाद म्हणत नाही; शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
Sharad Pawar On Vote Jihad : व्होट जिहादला देवेंद्र फडणवीसांनी सुरूवात केली असून विशिष्ट समाजाच्या मतदानाला धार्मिक रंग दिला असा आरोप शरद पवार यांनी केला.
सातारा : धर्माचा वापर करुन महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद केला जात असल्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला आता शरद पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यातल्या काही विशिष्ट भागात भाजपला जास्त मतदान होतं, त्याची आम्हाला सवय आहे. पण आम्ही त्याला कधीही व्होट जिहाद म्हटलं नसल्याचं शरद पवार म्हणाले. साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.
आम्ही तसा प्रचार करत नाही
व्होट जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे. इतर कधीही काढलेला नाही. यामुळे महाविकास आघाडीला मतदान झाले. एखादा विशिष्ट समाज किंवा हिंदू समाज जर एखाद्या शहरात जास्त प्रमाणात असेल, उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यातील काही भागात विशिष्ट समाज आहे. त्यांनी मतदान भाजपला केले तर आम्हाला सवय आहे की येथे असंच होतं. याचा अर्थ आम्ही व्होट जिहाद समजत नाही. यामुळे व्होट जिहाद हा शब्द प्रयोग करून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक प्रकारे राजकीय कलह तयार केला आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
व्होट जिहादवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. धर्माचा वापर करुन मविआ नेते व्होट जिहाद करतायत हे खेदजनक असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. जर कोणी व्होट जिहाद करत असेल तर आम्ही गप्प का बसायचं असा सवाल उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीसांनी केला होता.
ही बातमी वाचा: