एक्स्प्लोर

कपिल देवप्रमाणेच BCCI ला ICC चे माजी अध्यक्ष शरद पवारांचाही विसर? फायनलचं आमंत्रणच दिलं नसल्याची सूत्रांची माहिती

Sharad Pawar Not Invited For Finals: आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांना वर्ल्डकपच्या फायनलचं आमंत्रणच देण्यात आलं नव्हतं, विश्वसनीय सूत्रांची ABP माझाला माहिती

Sharad Pawar Not Invited For ICC World Cup Final 2023, IND vs AUS : मुंबई : आयसीसी वर्ल्डकप 2023 (ICC World Cup 2023) वर नाव कोरण्याची टीम इंडियाची (Team India) इच्छा यंदाही अपूर्णच राहिली. मोठ्या शिताफिनं कांगारूंनी टीम इंडियाचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्डकपचा खिताब पटकावला. यंदा वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे (India) होतं. वर्ल्डकप 2023 जेवढा रोमांचक होता, तेवढाच तो काही कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकलाय.

वर्ल्डकपबाबतचा सध्याचा चर्चेत असलेला वाद म्हणजे, वर्ल्डकपच्या फायनलसाठी देश-विदेशातीह अनेक मान्यवर उपस्थित होते. परंतु, देशाला पहिला वर्ल्डकप पटकावून देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांना मात्र आमंत्रण नव्हतं. यावरुन बीसीसीआयच्या आयोजनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच आता कपिल देव यांच्यासोबतच वर्ल्डकप फायनलसाठी आमंत्रण न मिळेल्या यादीमध्ये आणखी एका दिग्गज नावाचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. ते नाव म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचं. 

ICC चे माजी अध्यक्ष शरद पवारांनाही WTC फायनलचं आमंत्रण नाही 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही वर्ल्डकप 2023 च्या फायनलचं आमंत्रण देण्यात आलं नव्हतं, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. शरद पवार यांनी बीसीसीआय आणि आयसीसीचं अध्यक्ष पद भूषवलं आहे. त्यामुळे बीसीसीआकडून त्यांना आमंत्रण देणं अपेक्षित होतं. मात्र, बीसीसीआयनं शरद पवारांना फायनलचं आमंत्रण दिलेलं नव्हतं, अशी माहिती सूत्रांच्या वतीनं हाती आली आहे. 

कपिल देव यांनाही आमंत्रण नाही, म्हणाले, "कधी-कधी लोक विसरुन जातात"

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वर्ल्डकपवर सर्वात पहिल्यांदा भारताचं नाव कोरणाऱ्या क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनाही बीसीसीआयकडून वर्ल्डकप फायनलचं आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. घडल्या प्रकाराबाबत स्वतः कपिल देव यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कपिल देव म्हणाले की, मला माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत हा प्रवास करायचा होता. पण मला त्या सोहळ्यासाठी आमंत्रणच दिलं नव्हतं. त्यांनी मला बोलावलं नाही, त्यामुळे मी गेलोच नाही. मला असं वाटत होतं की, अंतिम सामना पाहताना माझ्यासोबत 1983 ची संपूर्ण टीम असावी, परंतु मला असं वाटतंय की, खूप मोठं आयोजन होतं आणि कधीकधी लोक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी विसरुन जातात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

कभी-कभी लोग भूल जाते हैं! भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांना फायनलचं आमंत्रणच नव्हतं, काँग्रेसकडून BCCI वर ताशेरे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Embed widget