एक्स्प्लोर

Ajit Pawar: 'विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा..', वेश बदलून जाणं अजितदादांनी नाकारलं अन्...; शरद पवार गटाने शेअर केला तटकरेंचा 'तो' व्हिडिओ

Ajit Pawar: एकीकडे अजित पवार यांनी आपण वेश बदलून दिल्लीला जात नव्हतो अशी भूमिका घेतली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Ajit Ajit Pawar: गेल्या काही दिवसामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे राज्यातील सत्तेत सामील होण्याआधी वेष बदलून दिल्लीला जात होते, त्यांनी नाव बदलून विमानाने प्रवास केल्याच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या. या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत देखील हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विमानात वेश बदलून नाव बदलून जाण्याची परवानगी कशी दिली याची चौकशी व्हावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. यावर अजित पवारांनी काल (शुक्रवारी) याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी मी वेश बदलून गेलो त्याचे पुरावे दाखवा जर ते खरं असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेतो आणि पुरावे नसतील तर ज्यांनी आरोप केले त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं असंही अजित पवारांनी म्हटलं होतं अशातच शरद पवार यांच्या पक्षाने एक व्हिडिओ शेअर करत हल्लाबोल केला आहे.

एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपण वेश बदलून दिल्लीला जात नव्हतो अशी भूमिका घेतली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये अजित पवार आले होते त्यांची आणि दिल्लीतल्या पत्रकारांची अनौपचारिक चर्चा देखील झाली आणि यामध्ये त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चर्चेबाबत उल्लेख केला आहे. या व्हिडिओसोबत शरद पवार गटाने "हम तो डूबेंगे ही "दादा" तुम्हें भी ले डूबेंगे..!! बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा..!!" अशा पध्दतीचं कॅप्शन देखील दिलं आहे.

व्हिडिओमध्ये सुनील तटकरे काय म्हणतात?

काल दिवसभर अजितदादा दिल्लीमध्ये होते. भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागाकडे ते आपले वेगवेगळे प्रश्न मांडण्यासाठी आले होते. त्यांच्या शासकीय बैठका संपल्या नंतर ते माझ्या निवासस्थानी होते. तेव्हा दिल्लीतील पत्रकार मित्रांनी मला विनंती केली दादांशी चर्चा व्हावी. माझ्या विनंतीनंतर दादांनी मान्यता दिली. पत्रकारांशी तासभर गप्पा झाल्या. त्यामध्ये दादांनी त्यांच्याशी खेळीमेळीत चर्चा केली. त्यांचा सर्व तपशील चर्चा सुरू आहे. त्यावर तटकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, दिल्लीत पत्रकार मित्रांशी दादा बोलले त्यांच्याकडून मास्क आणि बाकीच्या गोष्टीचा तपशील घ्या. दादा त्यांच्याशी बोलले  आणि त्यांना सांगितलं त्यांच्याकडून माहिती घ्या असंही यावेळी तटकरे म्हणालेत. 

वेश बदलून गेल्याच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

मी नाव आणि वेश बदलून प्रवास केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. मी कधीही वेश बदलून प्रवास केला नाही. माझ्याबाबत चाललेल्या चर्चा धादांत खोट्या आहेत. याबाबत बोलताना आधी माहिती तरी घ्यावी. गेल्या ३५ वर्षात मी राज्याचा आमदार राहिलो, खासदार होतो, अनेकदा उपमुख्यमंत्री राहिलो आहे, मी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो, मला माझी जबाबदारी कळते. एखाद्याने आपलं नाव बदलून जाणं हा देखील गुन्हा आहे. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले. त्यामध्ये काहीही तथ्य नाही असं  आज अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. 

सकाळचा नऊचा भोंगा वाजतो त्यांनी पण म्हटलं अजित पवारांनी (Ajit Pawar) असं केलं, मी काहीही केलं नाही. मी नाव, वेश बदलून कुठेही गेलो नाही, त्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? मला समाज ओळखतो, जर मी वेश बदलून आणि नाव बदलून गेलो ते सिध्द झालं तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन. नाही सिध्द झालं तर ज्या लोकांनी संसदेपासून राज्यापर्यंत माझ्यावर आरोप केले त्यांनी निवृत्ती घ्यावी असं आव्हान नाव न घेता अजित पवारांनी (Ajit Pawar) सुप्रिया सुळेंना केलं आहे. तर मी कोणत्या विमानातून गेलो, कोणी मला पाहिलं, मला कुठं जायचं असेल तर मी उजळ माथ्याने जाईन, मला लपून छपून राजकारण करण्याची गरज नसल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

थोरल्या पवारांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःच्या महायुतीतील सहभागाबाबतचा किस्सा सांगितला. दिल्लीत पत्रकारांसोबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अध्यक्ष अजित पवार यांचा गप्पांचा फड रंगला होता. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी महायुतीसोबत जाण्यापूर्वी काय-काय आणि कसं-कसं जुळवून आणलं? याबाबत अनेक खळबळजनक खुलासे केले. 

अजित पवारांच्या वेशांतराची इन्साईड स्टोरी 

मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केला आहे. दिल्लीत पत्रकारांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये कशी सहभागी झाली? याबद्दलचे खुलासे केले. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दहा वेळा बैठका झाल्या होत्या, असंही अजित पवार यांनी सांगितलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Embed widget