Viplav Bajoria : कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षेत गैरप्रकार, शिवसेनेच्या आमदाराचे कृषी विभागाच्या सचिवांना पत्र
शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली आहे.
Viplav Bajoria : कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याबाबत शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली आहे. 10 एप्रिलला 61 पदांसाठी परिक्षा झाली होती. मात्र, यावेळी परीक्षा केंद्रावर सुरक्षा नव्हती, परिक्षा केंद्रात कॉपी झाली, अनेक परीक्षार्थींनी कोरे पेपर दिल्याचा पत्रात गंभीर आरोप करण्यात आला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अकोला अंतर्गत कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सत्ताधारी शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी केली आहे. विप्लव बाजोरिया विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य आहेत. आमदार विप्लव बाजोरिया यांच्याबरोबर आणखी दोन कार्यकारी परिषद सदस्यांनी कृषी विभागाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रावर सह्या केल्या आहेत.
नेमकं काय म्हटलं पत्रात
कृषी सहाय्यक पदाच्या परीक्षेत उत्तर पत्रिका सोडवण्यासाठी देण्यात आल्या. त्यानुसार बऱ्याच परीक्षार्थींना उत्तर पत्रिका सोडवल्या. मात्र, काही ठराविक परीक्षार्थींना कोऱ्या उत्तर पत्रिका ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. असे बऱ्याच परीक्षार्थींच्या निदर्शनास आले. यातील काही परीक्षार्थींनी ही बाब आमच्या लक्षात आणून दिल्याचे आमदार विप्लव बाजोरिया यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे असे निदर्शनास येते की, ज्या परीक्षार्थींना मेरीटमध्ये उत्तीर्ण करायचे आहे त्यांना कोऱ्या उत्तर पत्रिका ठेवायल्या सांगितल्या. जेणेकरुन तपासणीच्या वेळी भरुन घेता येतील. त्यामुळेच या परिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरप्रकार दिसून येतो असे कृषी विभागाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे सदर परीक्षेचा निकाल आपण आपल्या स्तरावर चौकशी केल्यानंतर लावावा अशी विनंती आमदार विप्लव बाजोरिया यांनी पत्रात केली आहे. तसे आदेश विद्यापीठ प्रशासनाला द्यावेत असेही त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवस पोस्टरवरुन 'रामा'यण, समरजीत घाटगे करणार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
- माय लॉर्ड, तुम्हीच सांगा... 'सामना'तून किरीट सोमय्यांच्या अटकपूर्व जामीनावर प्रश्न उपस्थित