Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवस पोस्टरवरुन 'रामा'यण, समरजीत घाटगे करणार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावात प्रभू श्रीरामाचं नाव चित्रित केल्यावरुन कोल्हापुरात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हा संपूर्ण प्रकार निंदनीय असल्याचे भाजप नेते समरजीत घाटगे यांनी म्हटलय.
![Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवस पोस्टरवरुन 'रामा'यण, समरजीत घाटगे करणार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार Bjp leader Samarjit Ghatge will lodge a complaint against Minister Hasan Mushrif at the police station Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवस पोस्टरवरुन 'रामा'यण, समरजीत घाटगे करणार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/44ea5f34994a26ce2c08b5b22f98ac86_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hasan Mushrif : कोल्हापुरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसावरुन रामायण सुरु झालं आहे. हसन मुश्रीफ यांच्या नावात श्रीरामाचं नाव चित्रित केल्यावरुन कोल्हापुरात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. हा संपूर्ण प्रकार निंदनीय असल्याचे सांगत भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी आक्षेप नोंदवला आहे. याप्रकरणी समरजीत घाटगे यांनी पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितलं आहे.
प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे घाटगे यांनी म्हटले आहे. राम नवमी दिवशी हसन मुश्रीफ यांच्या नावाच्या केलेल्या डिझाईनला घाटगे यांनी आक्षेप घेतला आहे. मुश्रीफांच्या असंवेदनशील कृत्याविरुद्ध मी स्वतः कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करणार असल्याचे घाटगेंनी म्हटले आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडून श्रद्धाळू बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य झाले आहे.
प्रकरण नेमकं काय?
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाला लावलेल्या पोस्टरवरुन वादंग निर्माण झाले आहे. मुश्रीफ यांचे नाव श्रीरामांसोबत जोडल्याने वाद निर्माण झाला आहे.10 एप्रिलला राम नवमीदिवशी हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र, वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर हसन मुश्रीफ यांचे नाव श्रीरामांसोबत जोडले होते. यावरुन भाजप नेते समरजीत घाटगे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. हसन मुश्रीफ स्वत: ला रामाच्या बरोबर समजू लागले आहे का? असा सवाल घाटगे यांनी केला आहे.
तुम्ही आज पूर्ण भारताची, बहुजन समाजाची भावना दुखावली आहे, त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवली आहे. येत्या काळात हा बहुजन समाज तुम्हाला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये सिंहाचा वाटा माझा असेल असे घाटगे म्हणाले. त्यामुळे मी कागल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे घाटगेंनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)