Udayanraje: 'मावळ्यांची शाळा' जागवणार मराठ्यांचा धगधगता इतिहास; उदयनराजेंच्या प्रेरणेतून राबवली जाणार संकल्पना
'मावळ्यांची शाळा' या माध्यमातून शिवरायांच्या सोबत लढलेल्या मावळ्यांचा इतिहास, त्याची माहिती नव्या पीढीसमोर ठेवण्यात येणार आहे.

सातारा: लहान मुलांना भावी आयुष्यात वाटचाल करत असताना त्यांना इतिहासाचा विसर होऊनये म्हणून मावळ्यांच्या शाळेच्या माध्यमातून जागृती केली पाहिजे असं खासदार उदयनराजे म्हणाले. उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त ते नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यावर आता उत्तर मिळालं असून त्यांच्या प्रेरणेतून “मावळ्यांची शाळा” अशी एक संकल्पना राबवली जाणार आहे.
काय आहे मावळ्यांची शाळा?
छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांच्याबरोबर लढलेले मावळे यांची माहिती पाठ्यपुस्तकात खूप कमी प्रमाणात असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर त्यांचा इतिहास फक्त चौथी आणि सातवीच्या पुस्तकातच शिकवला जातो. त्यामुळे हा इतिहास सर्व विद्यार्थांपर्यंत यावा आणि तो त्यांच्या स्मरणात दीर्घकाल राहावा या उद्देशातून 'मावळ्यांची शाळा' म्हणून ही कल्पना उभी केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक मावळ्याची माहिती व्हिडीओ कॅसेट तयार करून प्रत्येक शाळेत त्याचे वाटप केले जाणार आहे. प्रत्येक शाळा आणि शिक्षकांनी ही मावळ्यांची माहिती व्हिडीओद्वारे वर्गातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी दाखवावी. जेणेकरून छत्रपती शिवराय आणि शिवरायांच्या काळातील मावळे यांचा इतिहास हा त्याच्यासमोर कायम स्मरणात राहावा हा या कार्यक्रमाच्या मागचा एक उद्देश आहे.
साताऱ्यात रिक्षासौंदर्य स्पर्धा
खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्ताने साताऱ्यात रिक्षा सौंदर्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावत उदयनराजेंनी सर्वच स्पर्धकांचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमाला येताना उदयनराजेंनी सुंदर सजवलेल्या रिक्षातून स्टेजपर्यंत एन्ट्री केली. माझीही एक रिक्षा असेल आणि त्याचा नंबर 'एक' असेल. मात्र तो शेवटून पहिला असेल असं म्हणत उदयनराजेंनी सर्वांनाच हसवले.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
