शासकीय वाहनांसाठी पेट्रोलसह डिझेलचा साठा शिल्लक ठेवा, जालन्यात पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश
जालना जिल्ह्यातील शासकीय वाहनांसाठी पेट्रोलसह डिझेलचा साठा शिल्लक ठेवा, असे आदेश पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप चालकांना दिले आहेत.
Jalna : जालना जिल्ह्यातील शासकीय वाहनांसाठी पेट्रोलसह डिझेलचा साठा शिल्लक ठेवा, असे आदेश पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप चालकांना दिले आहेत. संभाव्य इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी हे आंदेश जारी केले आहेत. कोणत्याही पेट्रोल पंपावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची तहसीलदारांनी दक्षता घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यातील शासकीय वाहनांसाठी आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोलसह डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश जालन्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप चालकांना दिले आहे. इराण इस्रायल युद्धा युद्धाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य इंधन तुटवड्याची शक्यता पाहता जालना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत. तर कोणत्याही पेट्रोल पंपावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता तहसीलदारांनी घेण्याची देखील निर्देश पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहे.
इंधनाचा मुबलक साठा, अफवांवर विश्वास ठेवू नये, बीड जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
दुबईत अडकलेल्या बीड मधील पाच पर्यटकांना भारतात सुखरूप आणल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिलीय. बीड जिल्ह्यातील 21 नागरिक दुबईमध्ये होते. त्यातील आठ जण कामानिमित्त तेथे आहेत. इतर 13 पर्यटक असून त्यातील पाच जणांना भारतात आणण्यास यश आले. तर उर्वरित पर्यटकांना आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील इतर कोणाचे नातेवाईक युद्धजन्य परिस्थितीत अडकले असल्यास जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. तर इंधनाच्या साठ्याबाबत जिल्ह्यात अफवा पसरल्याने काही पेट्रोल पंपावर वाहन चालकांनी गर्दी केली होती. परंतु याबाबत पेट्रोल सप्लायर्स कंपन्यांसोबत बैठक पार पडली असून इंधनाची कमतरता नाही. जिल्ह्यात मुबलक इंधन साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















