Satara : साताऱ्यातील आजोबांची कमाल! दोघांनी अख्खी दरड हटवून रस्ता मोकळा केला
Satara Rain Updates : ग्रामस्थ आणि पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन दोन वयोवृद्ध नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता ही दरड हटवून रस्ता मोकळा केला आहे.
Satara Rain Updates : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस कोसळला (Satara News) आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळू लागल्या आहेत. कास शेजारील भांबवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसापूर्वी दरड कोसळली होती. यामुळे भांबवली गाव आणि वजराई धबधब्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. दरड कोसळली असल्याने या रस्त्यावरून ये जा करताना ग्रामस्थ आणि पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जाव लागत होतं.
ग्रामस्थ आणि पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन दोन वयोवृद्ध नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता ही दरड हटवून रस्ता मोकळा केला आहे. 65 वर्षाचे चंद्रकांत मोरे आणि 50 वर्षाचे बळीराम सपकाळ यांनी स्वतः हातात कुदळ आणि फावडे घेऊन भर पावसात मेहनत घेऊन ही दरड बाजूला केली. या दोन्ही आजोबांनी केलेल्या या कामाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे. या दोन्ही आजोबांची प्रेरणा घेऊन शासकीय यंत्रणेने देखील अशाच प्रकारचे तत्परतेने काम करण्याची गरज असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.
कोयनेत 60 टीएमसी साठा
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी असली तरी पश्चिमेकडेही जोर ओसरला आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. तर पाऊस कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवकही कमी झाली असून कोयनेत 60.20 टीएमसी साठा झाला आहे. तसेच नवजा येथे 43 आणि महाबळेश्वरला 28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोयनेच्या शिवसागर जलाशयावर 'केबल पूल'
कोयनेच्या शिवसागर जलाशयावर 'केबल पूल' उभारणार असल्याची माहिती मिळाली आहे. तापोळा इथं होणारा अत्याधुनिक केबल पूल पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचा दावा केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Maharashtra Rain : मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणात पावसाची हजेरी, काही ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका