एक्स्प्लोर

प्रेमात मन जुळतात असं ऐकलं होतं! पण इथं कुंडलीसह बारावीत मार्कही 'सेम टू सेम'

प्रेमानंतर कुंडली जुळणं आणि आता परीक्षेतही एकमेकाचे मार्क जुळणं हा खर तर योगायोग मानला जात असला तरी या नवदाम्पत्याच्या सुखी संसारासाठी हा योगायोग नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही.

सातारा : प्रेम जुळवूण कुंडली जुळवणं आणि कुंडली जुळल्यानंतर दिलेल्या परीक्षेचे मार्क जुळणं, हे थोड अतिच होतंय ना? हो पण असं घडलय. साताऱ्यातील सांगवड आणि गणेवाडी गावातील प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याच्या जीवनात. प्रेम करुन कुंडली जुळवत लग्न करणाऱ्या या नवदाम्पत्याना बारावीच्या निकालात सेम टू सेम मार्क मिळालेत.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गणेवाडी येथील आदिक कदम आणि पाटण तालुक्यातीलच सांगवड गावातील किरण सुर्यवंशी या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. मुलगी बारावीत तर मुलाने 11 वी मधूनच शिक्षण थांबवले होते. या दोघांच्या प्रेमामध्ये एक दरी तयार झाली होती. मुलीने मुलाला अट टाकली तू बारावीची परिक्षा दे तरच मी तुझ्याशी लग्न करेन. मुलाने नाय हो करत होकार दिला. आणि बाहेरून बारावीचा फॉर्म भरला. मुलाने बारावीचा फॉर्म भरल्यामुळे मुलगी खुष झाली आणि दोघांचे प्रेम आणखीनच घट्ट झाले. फिरण बोलणं आणि सारखा हातात मोबाईल, यामुळे घरापासून ते गावाच्या त्या टोकापर्यंत या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु झाली.

कुंडली चक्क 31 गुणांनी जुळली मुलाचे शिक्षण आणि मुलाच्या आणि मुलीच्या वयातील फरकामुळे तर घरातल्यांकडून रेड सिग्नल. घरातल्यांच्या विरोधामुळे दोघांनीही परीक्षेनंतर प्रेमविवाह करायचेच असे ठरवले. परीक्षा झाली आणि कोरोनाचं भल मोठ संकट समोर ठाकलं. लॉकडाऊनमुळे दोघही थोडे थांबले. परंतु, दोघांनीही घरातल्यांची समजूत काढायला सुरुवात केली. मुलगी चार दिवस जेवली नाही तर मुलगाही चार दिवस उपाशी. अखेर घरातल्यांनी होकारा दिला. मात्र, घरातल्यांनी प्रेमासमोर दुसर संकट उभ केलं. दोघांच्या घरातल्यांनी कुंडलीचा विषय काढत कुंडली जुळली तरच लग्न लावून देतो असा अट्टाहास धरला. आता बिनकुंडली बघता केलेलं प्रेम हे कुंडलीत जाऊन अडकू शकते असे वाटत असताना ज्योतिष शास्त्राकडे जन्मपत्रिका ठेवल्या. आणि दोघांच्या आनंदाचा एक क्षणच म्हणावा. कुंडली चक्क 31 गुणांनी जुळली. दोघांच्या आनंदाचा पाराच उरला नाही. आणि दोन्ही घरातील संमतीने लॉकडाऊनमध्येच म्हणजे 14 मेलाच दोघांचा विवाह थाटामाटात झाला.

क्रिकेटच्या मैदान गाजवणारी रसिका शिंदेने बारावीच्या परीक्षेत मारली बाजी

लॉकडाऊनमध्येही हे नवदाम्पत्य कोरोनाला विसरुन गावभर फिरत होते. या दोघांची परीक्षेपासून ते लग्नाच्या स्टेजपर्यंत आणि स्टेजपासून ते लग्नानंतर ही सारखा एकच विषय, दोघांपैकी कोणाला जास्त गुण मिळणार. त्यात निकालाच्या तारखा मागंपुढं. दोघांचाही जीव खालीवर. अखेर निकालाची तारीख ठरली. आणि निकालाचा दिवस उजाडला. एक वाजता दोघांनी एकत्र बसून पहिल्यांदा किरणचा निकाल पहाण्याचं ठरवलं. निकाल बघितला तर फक्त 323 मार्क. कमी पडलेले मार्क बघून किरण नाराज झालीच शिवाय घरातले सर्वजण. नंतर आदिकचा निकाल उघडला. आदिकलाही 323 मार्क. हे अस कसं म्हणत दोघांचेही मार्कलिस्ट चार-चार वेळा ओपन करुन पाहिले. मात्र, कशाच काय दोघांचे मार्क सेमच होते.

एकमेकाला हिणवू शकतो अशा अविर्भावात असलेल्या दोघांनी सेम टू सेम गुण मिळवले होते. या नवदाम्पत्याचा हा योगायोग म्हणजे या दोघांच्या कमी मार्क पडलेल्याच्या दु:खावर पाणीच म्हणाव लागेल. कारण हे दोघच काय पण दोघांच्या आई-वडिलांना सुध्दा भारीच वाटले. आणि मंग काय या दोघांच्या मार्कची चर्चा गावभर सुरु झाली. आनंदाला पाराव उरला नाही. या दोघांचे मार्कलिस्ट आणि दोघांच्या लग्नाची गोष्ट सोशलमिडीयावर चांगलीच व्हायरल झाली.

प्रेमानंतर कुंडली जुळणं आणि आता परीक्षेतही एकमेकाचे मार्क जुळणं हा खर तर योगायोग मानला जात असला तरी या नवदाम्पत्याच्या सुखी संसारासाठी हा योगायोग नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही.

Maharashtra HSC Results 2020 | बारावीच्या निकालाची विभागवार आकडेवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
Embed widget