सांगली शिवसेना जिल्हाप्रमुखांची जयंत पाटलांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
जयंत पाटील हे सत्तेचा गैरवापर व जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या आमदारांची खच्चीकरण करत असल्याचा आरोपही संजय विभूते यांनी केला आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यातील शिवसेना आणि शिवसैनिकांना दुजाभावाची वागणूक राष्ट्रवादीचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील देत असल्याची तक्रार सांगली शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याबाबतचे गाऱ्हाणे पक्षप्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे.तसेच जयंत पाटील हे सत्तेचा गैरवापर व जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या आमदारांची खच्चीकरण करत असल्याचा आरोपही संजय विभूते यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी,असा भडका उडण्याची शक्यता निर्माण होणार आहे.राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्र आहे. सांगली जिल्हा स्तरावर मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दरी वाढत असल्याचं समोर आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून शिवसेना आणि शिवसैनिक यांच्यावर अन्याय करतो दुजाभाव वागणूक देण्यात येत असल्याची तक्रार सांगली जिल्हा शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
राज्यात एकत्र सरकार असताना सांगली जिल्ह्यात मात्र जयंत पाटील हे शिवसेनेवर वारंवार अन्याय करणारी भूमिका घेत आहेत असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी केला आहे गेल्या वर्षी एक वर्षाच्या काळामध्ये जयंत पाटील यांनी कोणत्याही प्रकारची समन्वयाची बैठक शिवसेनेसोबत घेतली नाही. त्यामुळे राज्यात असणाऱ्या महाविकासआघाडी मधील शिवसेनेची सांगली जिल्ह्यामध्ये फरफट सुरू आहे.
शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात येईल, निधी उपलब्ध करण्यात थोड्या अडचणी आहेत पण त्यावरही आपण मात करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्या जिल्ह्यात विकास कामांवर भर द्यावा, अशा सूचना देखील ठाकरेंनी केल्या असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :