एक्स्प्लोर

'सज्ज व्हा...!महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचाय', जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं आवाहन

महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे.

मुंबई :महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे.  काल रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत जिल्हाप्रमुख आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात येईल, निधी उपलब्ध करण्यात थोड्या अडचणी आहेत पण त्यावरही आपण मात करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्या जिल्ह्यात विकास कामांवर भर द्यावा, अशा सूचना देखील ठाकरेंनी केल्या असल्याची माहिती आहे.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला होता. त्यात  त्यांनी म्हटलं होतं की,  राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. आम्ही गुळाला चिकटलेले मुंगळे नाहीत. महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघांचं राज्य आहे. जो महाराष्ट्रच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुढी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.

भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दर्शवला आहे. हीच खेळी त्यांनी महाराष्ट्रात केली होती. एकीकडे पाठिंबा दाखवायचा आणि छुप्या मार्गाने दगा करायचा. मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलोय. महाराष्ट्रातही हाच डाव होता, मात्र शिवसेनेनं हा डाव हाणून पाडला, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.

देशात कोरोनाचं संकट असताना त्यांना राजकारण सूचतंय. निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये मोफत कोरोनाची लस देण्याची घोषणा करता. मग उर्वरित भारत काय बांगलादेश आहे का? त्यांच्याकडून पैसे घेणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता.

नुसत्या काळ्या टोप्या घालू नका, त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्या

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. नुसत्या काळ्या टोप्या घालू नका. त्याखाली डोकं असेल हिंदुत्व समजून घ्यावं. घंटा वाजवा, थाळ्या वाजवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. शिवसेनाप्रमुख यांचे हिंदुत्व आणि तुमचे हिंदुत्व यात फरक आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. इथं गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता, हे कसले हिंदुत्व असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
RBI Repo Rate Cut: आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, सलग दुसऱ्या तिमाहीत रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Khadakpurna Kailas Nagre News : शासनाकडून आवश्यक मदत मिळणार : माणिकराव कोकाटे कृषिमंत्रीSanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवालTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : 13 March 2025 : ABP MajhaNagpur Teachers On School : एप्रिल अखेरपर्यंत चालणाऱ्या परीक्षांना शिक्षक समितीचा विरोध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif on Jayant Patil : 'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
'जयंत पाटलांनी मला नागपुरात मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही बोलून दाखवलं होतं, त्यामुळे...' मुश्रीफांचा गौप्यस्फोट
RBI Repo Rate Cut: आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
आरबीआय आणखी एक गुड न्यूज देणार, सलग दुसऱ्या तिमाहीत रेपो रेटमध्ये कपातीची शक्यता, कर्जदारांना दिलासा
Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
रासायनिक रंगांची रंगपंचमी खेळताय? सावधान, 'या' आजारांना मिळू शकते निमंत्रण
YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
Narayana Murthy : गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
Aadhaar Card : आधार PVC कार्ड कसं काढायचं? किती रुपये द्यावे लागतात ? कसा अर्ज करायचा? जाणून घ्या
Aadhaar Card : आधार PVC कार्ड काढा अन् टेन्शन फ्री व्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Embed widget