एक्स्प्लोर
सांगलीत सरपंचाची घराशेजारीच निर्घृण हत्या
सांगली : सांगलीत सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे विद्यमान सरपंच युवराज पाटील यांची बुधवारी रात्री एकच्या सुमारास घराशेजारीच हत्या झाली.
युवराज पाटील हे देशिंग गावाहून चारचाकीने आपल्या हरोलीतील घरी जात होते. घरासमोर गाडी लावून ते घराकडे निघाले असताना, या भागात अंधारात दबा धरुन बसलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी त्यांच्या मान आणि डोक्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
युवराज पाटील हे शिवसेनेचे कवठेमहांकाळ तालुका प्रमुख दिनकर पाटील यांचे बंधू आहेत. युवराज पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारीही होते. युवराज पाटील यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. गावात राजकीय वर्चस्ववादातून दोन गटात नेहमी धुसफूस असायची. त्यामुळे पूर्ववैम्यनस्य आणि राजकीय वर्चस्ववादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण आहे. या घटनेमुळे कवठेमहांकाळ शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement