एक्स्प्लोर
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात संभाजीराजे छत्रपतींची वर्णी?
राज्यातील मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा चेहरा म्हणून संभाजीराजेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होणार आहे. त्यामुळे यामध्ये कुणाची एंट्री होणार आणि कुणाची एक्झिट, याची चर्चा रंगणं स्वाभाविक आहे.
राज्यातून शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर राज्यातलं आणखी एक सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे खासदार संभाजीराजे छत्रपती. राज्यातील मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा चेहरा म्हणून संभाजीराजेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रावर कृपादृष्टी होणार का?
मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे गडकरी, प्रभू, जावडेकर, पीयुष गोयल, आठवले, हंसराज अहिर, सुभाष भामरे असे एकूण सात मंत्री आहेत. शिवाय शिवसेनेकडून अनंत गीते. जावडेकर हे पुण्याचे असले तरी ते राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ज्या पद्धतीने मराठा मोर्चाचं वादळ उठलेलं होतं, ते पाहता पश्चिम महाराष्ट्रातला एखादा मराठा चेहरा मंत्रिमंडळात येणार का याची उत्सुकता आहे. त्यादृष्टीने छत्रपती संभाजीराजे, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, पुण्याचे अनिल शिरोळे असे काही पर्याय उपलब्ध आहेत. भौगोलिक समीकरणाच्या निकषातून यातल्या कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
शिवसेनेला आणखी एक अपमान सहन करावा लागणार?
वाजपेयींच्या काळात 16 खासदार असताना शिवसेनेला 3 मंत्रिपदं मिळाली होती. मात्र आत्ता लोकसभेत 18, राज्यसभेत 3 असे एकूण 21 खासदार असतानाही शिवसेनेची बोळवण अवघ्या एका मंत्रिपदावर झाली. या विस्तारात शिवसेनेला आणखी एक मंत्रिपद वाढवून द्यायची भाजपची तयारी असल्याचं दिसतं. पण तेवढ्यानेही शिवसेनेवरचा अन्याय दूर होत नसल्याची भावना ज्येष्ठ नेत्यांमधे आहे.
भाजपसोबत नव्याने गाठ बांधलेल्या जेडीयूला दोन मंत्रिपदं मिळतील अशी शक्यता आहे. तसं झाल्यास 12 खासदार असलेल्या जेडीयूला 2 आणि त्यांच्या जवळपास दुप्पट खासदार असलेल्या सेनेलाही दोनच मंत्रिपदं कशी, असा सवाल सेनेचे काही ज्येष्ठ नेते विचारत आहेत. अर्थात ही वाजपेयी-अडवाणींची भाजप नसून मोदी-शाहांची भाजप असल्याने शिवसेनेची ही मागणी कितपत पूर्ण होणार याबद्दल शंका आहे.
संबंधित बातम्या :
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारातील महत्त्वाच्या 10 गोष्टी
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना नाराज
येत्या रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement