एक्स्प्लोर

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा समाधी विधी संपन्न, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची काल प्राणज्योत मालवली. अहमदपूर येथील भक्तिस्थळ या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

लातूर : राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची काल प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. काल रात्री अहमदपूर येथील भक्तिस्थळ या ठिकाणी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी (31 ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते.त्यातच आज अप्पांचे  निधन झाले.

त्यांच्या अंतिम संस्काराला भक्तिस्थळ या भागात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेत मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत या भागात लोकांनी येऊ नये असे आवाहान प्रशासन करत होते. महाराजांचा भक्तवर्ग हा महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगना आणि कर्नाटकात अधिक प्रमाणात आहे. अनेकांनी अंतिम संस्काराला येण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दुतर्फा पाच किलोमीटर अंतरापासूनच बॅरिकेटिंग केले होते. नांदेड येथून पार्थिव रात्री भक्तिस्थळ भागात दाखल झाले. या ठिकाणी भजन आणि नाम संकीर्तनात पार्थिव समाधीच्या ठिकाणी आणण्यात आले.

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा समाधी विधी संपन्न, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भक्तिस्थळ या ठिकाणी बिचकुंदा मठ संस्थानचे मठाधीश सोमलिंगेश्वर शिवाचार्य महाराज समाधीच्या विधीची व्यवस्था पाहात होते. संपूर्ण विधिवत समाधी विधी त्यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आला. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेवून समाधी विधी पार पाडणाऱ्या सर्व लोकांना पीपीई किट देण्यात आले होते. समाधीच्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा प्रवेश बंद करण्यात आला होता. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि लातूरचे पोलिस अधीक्षक राजेंद्र माने यांच्या नेतृत्वात संपूर्ण पोलिस दल या ठिकाणी हजर होते.

बंदुकीच्या फेरी झाडून शासकीय मानवंदना देण्यात आली. औसा मतदरसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी पुष्पचक्र अपर्ण केले. रात्री साढे अकरा वाजता संपूर्ण विधि पार पडला.  यावेळी अनेक शिवाचार्य महाराज हजर होते. समाधी विधी संपन्न होत असताना अहमदपूर मठाचे उत्तराधिकारी राजेश्वर स्वामी आणि हाडोळती मठाचे उत्तराधिकारी राजकुमार स्वामी यांना मठाचा कारभार सोपवण्यात आला.

राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे सामाजिक आणि आध्यात्मिक कामातील योगदान लक्षात घेऊन त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशी विनंती मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ त्यास मंजूरी देत प्रशासनास तशा सूचना केल्या.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग

राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते. लाहोर विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. कोण होते अहमदपूरकर महाराज?
  • लिंगायत समाजातील नावाजलेल्या महाराजांपैकी एक. वयाच्या 104 वर्षीही ते कार्यमग्न असे.
  • अहमदपूर मठाशी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या भागातील भक्तगण जोडलेले आहेत.
  • लाहोर विद्यापीठात स्वतंत्र पूर्व काळात एमएमबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. लिंगायत धर्म प्रसारात ते सतत कार्यरत राहिले.
  • वृक्ष जोपासना, राष्ट्र धर्म, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता. यासाठी राज्यभर लाखोंच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे उत्तम संबध होते.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटNavi Mumbai Airport :  काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठारABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Embed widget